अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंद

अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.
अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंद
अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंदSaamTv
Published On

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच संगमनेर शहरासह तालुक्यातील पठारभागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी साकूर गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी करून पठार भागातील वीस गावात उद्या पासून दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहे.

हे देखील पहा -

जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी संगमनेर तालुका तसेच साकूर भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करुन नियमांचे उल्लंघन यास कारणीभूत असल्याचे सांगितले.

अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंद
लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही

साकूरसह पिंपळगाव देपा, हिवरगाव, पठार व नांदूर खंदरमाळ, या भागातून दररोज 30 ते 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालये ‘सील’ करण्यासह दुपारी चारनंतरही दुकाने सुरु ठेवणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या पासून दहा दिवस पठारावरील वीस गावामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com