Vantara officials meet Kolhapur authorities over the return of temple elephant Mahadevi, as villagers and leaders rally for her comeback Saam Tv
महाराष्ट्र

Mahadevi Elephant: नांदणी ग्रामस्थांच्या संघर्षाला यश ? 'महादेवी' कोल्हापूरात परतणार?

Kolhapur Villagers Protest: गुजरातमधल्या वनतारा प्राणीसंग्रहालयामध्ये नेण्यात आलेली महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात परत येण्याची आशा निर्माण झाली आहे. कोल्हापुरातल्या वनताराच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं? नांदणी ग्रामस्थांच्या संघर्षाला यश येणार का?

Omkar Sonawane

कोल्हापूरकरांच्या विरोधाला डावलून गुजरातमधील वनतारात नेलेल्या महादेवीला परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यासाठी मठातील स्वामींसह कोल्हापुरातील नेते एकवटलेत. वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत बैठक घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी चर्चा झालीय. हत्तीणाला परत पाठवण्यासाठी वनताराकडून सकारात्मक संकेत देण्यात आलेत. तर जनभावना लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत महादेवीला परत आणण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिलीय.

वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे स्वामी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये दीड तास बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली एक नजर टाकूया

- महादेवीला परत करण्याची मठाधिपती यांची मागणी

- महादेवीला घेऊन जाण्यामध्ये आपला संबंध नसल्याचं 'वनतारा'च्या प्रशासनाचं म्हणणं

- हत्तीणीला परत पाठवण्यासाठी 'वनतारा'च्या सीईओंकडून सकारात्मक संकेत

- हत्तीणीला परत करायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं

- नांदणी परिसरामध्ये 'वनतारा'चं एक युनिट उभं करण्याची तयारी

- आजरा, चंदगड, राधानगरी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींबाबत लोकप्रतिनिधींकडून 'वनतारा'ला प्रस्ताव

श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडक्या महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. खासदार धनंजय महाडिकांनीही केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी यावरुन हल्लाबोल केलाय.

सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवीला वनतारामध्ये नेण्यात आलं. नांदणी येथील मठाला 1300 वर्षांचा वारसा आहे. भाविकांसाठी 'महादेवी' पूजनीय आहे. 33 वर्षांपासून ग्रामस्थ हत्तीणीचा सांभाळ करत असतील तर आत्ताच प्राणी हक्काचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला ? वनतारा सारख्या खाजगी प्राणीसंग्रहालयात महादेवीला नेण्यामागचं कारण काय? असा सवाल उपस्थित होतोय. मात्र आजच्या बैठकीनंतर स्थानिकांच्या संघर्षाला यश येऊन महादेवी पुन्हा थाटात कोल्हापुरात कधी परतणार ? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT