Mahadev Munde Saam Tv
महाराष्ट्र

Mahadev Munde: गळ्यावर वार, श्वसननलिका कापली; रक्तवाहिन्या तुटेपर्यंत मारलं; महादेव मुंडेंची संतोष देशमुखांपेक्षा भयंकर हत्या

Mahadev Munde Case: बीडच्या महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणाला २० महिने झाले. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून आरोपींनी त्यांना किती क्रूरतेने मारले यांची भयानक माहिती समोर आली आहे.

Priya More

- महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती.

- त्यांच्या गळ्यावर २० सेमी लांब व खोल वार, एकूण १६ वार शरीरावर आढळले.

- हत्येच्या २० महिन्यानंतरही आरोपी फरार असून अटक झाली नाही.

- पत्नीने वारंवार न्यायाची मागणी केली असून आत्महत्येचा प्रयत्नही केला.

योगेश काशिद, बीड

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ९ पानांच्या या पीएम रिपोर्टमधून त्यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली होती ही माहिती समोर आली आहे. बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष मुंडे यांच्यापेक्षा भयंकरपद्धतीने महादेव मुंडे यांना संपवण्यात आले होते. आरोपींनी महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड- मान आणि हातावर तब्बर १६ वेळा वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांच्या कळ्यावर २० सेंमीपर्यंत लांब, ७ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल असा वार होता. या शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगाराची क्रूरता दिसून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी महादेव मुंडे यांची भरचौकात हत्या करण्यात आली होती. आरोपींनी महादेव मुंडे यांच्यावर इतक्या भयंकर पद्धतीने हल्ला केला होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हत्येनंतर महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर २२ ऑक्टोबर रोजी १२.१५ ते १.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल सव्वातास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी महादेव मुंडे यांच्या शरीरावर अनेक जखमी होत्या.

पोलिसांनी पंचनामा केला असता त्यावेळी महादेव मुंडे यांच्या अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेले पांढरी बनियन, ब्राऊन कलरचा शर्ट, लाल करदोरा आणि पाकीट होते. चेहरा छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. महादेव मुंडे यांच्या हत्येला २० महिने झाले. पण अद्याप त्यांच्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी पतीला न्याय मिळावा यासाठी वारंवर प्रयत्न करत आहेत. पतीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

महादेव मुंडे यांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. आरोपींनी आधी महादेव मुंडे यांचा गळा कापला. गळ्यावर समोरून वार केलामुळे त्यांची श्वसननलिका कापली गेली. त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. हल्ल्यामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्या तुटल्या होत्या. त्यांच्या शरीरावर १६ वेळा वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांच्या हातावर अनेक जखमा होत्या. तसंच त्यांच्या पायालाही मार लागला होता. महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी त्यांनी जागेवरच संपवलं.

महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल -

- महादेव मुंडेचा गळा कापला

- मानेवर उजव्या बाजूला ४ वार

- तोंड ते कानापर्यंत १ खोल वार

- शरीरावर तब्बल १६ वार

- मारहाणीमुळे शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला

- श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या

- मानेवर वार करताना घाव चुकला त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत वार

- डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार

- डावा गुडघा खरचटलेला खाली पडल्यानंतर

महादेव मुंडे यांची हत्या कधी झाली?

२१ ऑक्टोबर २०२२ रोजी परळीत भररस्त्यात महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली.

शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं आहे?

अहवालानुसार, महादेव मुंडे यांच्या गळ्यावर वार करत श्वसननलिका कापण्यात आली, शरीरावर १६ वार होते.

आरोपीला अटक झाली आहे का?

नाही, घटनेनंतर २० महिने उलटूनही आरोपी अजूनही फरार आहेत.

पीडित महिलेने न्यायासाठी काय पाऊल उचललं?

न्याय मिळत नसल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT