Shivraj Banger news Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

Shivraj Banger on Mahadev munde case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात शिवराज बांगर यांनी गंभीर आरोप केलाय. बांगर यांच्या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

Beed : महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून बीडचं राजकारण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. आता महादेव मुंडे प्रकरणात शरद पवार गटाने उडी मारली आहे. शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी पत्रकार परिषद घेतली. धनंजय मुंडे यांनी काल वंजारी समाजाच्या अधिवेशनांमधून भाषण केल्यानंतर या भाषणातील काही मुद्द्यांना शिवराज बांगर यांनी प्रतिउत्तर दिलं. तर परळी येथील महादेव मुंडे खुण प्रकरणाहून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवराज बांगर म्हणाले, 'धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराडला विचारल्याशिवाय गुन्हे दाखल होत नव्हते. माझ्यावर देखील खोटे कुणी दाखल करण्यात आले. बाळा बांगरवर देखील खोटे गुन्हे दाखल करण्यात आले'.

'आज बाळा बांगर सांगतोय की, वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केली. मात्र तरी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. राजकीय वरदहस्त आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा देखील कराडवर वरदहस्त आहे, असा गंभीर आरोप शिवराज बांगर यांनी केला आहे. शिवराज बांगर यांच्या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Burfi Recipe: रोज गोड खाण्याची इच्छा होते? मग एकदाच बनवा टेस्टी हॉटेल स्टाईल बेसन बर्फी, १५ दिवस राहिलं फ्रेश

Maharashtra Live News Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

Valachya Shengachi Bhaji: फक्त १५ मिनिटांत वालाच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT