Sushma Andhares Helicopter Crash Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

Mahad Helicopter Crash: सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल सुखरुप आहेत. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या .

Priya More

सचिन कदम, रायगड

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल आणि त्याचा असिस्टंट सुखरुप आहेत. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे.

सुषमा अंधारे गुरूवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या. याठिकाणची सभा आटपून त्या आज बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली.

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँड होत होते. तेव्हा अचानक हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, पायलट हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी अचानक मोठा आवाज होतो आणि हेलिकॉप्टर कोसळते. ही घटना कशामुळे घडली याच कारण अद्याप समोर आले नाही. पण या घटनेमध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणारा पायलट आणि त्याचा असिस्टंट सुखरूप आहे.

या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'मला बारामतीला महिला मेळाव्यासाठी जायचे होते. संध्याकाळी मंडणगडमध्ये रॅली होणार आहे त्यामुळे परत यायचे होते. ९ वाजता हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार होते. पण हेलिकॉप्टरला बराच वेळ लँडिंग व्हायला लागला आणि अचानक ते पडले. आम्हाला २ ते ४ मिनिटं काहीच कळाले नाही. आतल्या माणसांचे काय झाले असेल याची मला चिंता होती. पण कॅप्टन आणि त्याचा असिस्टंट सुरक्षित आहे.'

तसंच, 'मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही या विमानातून प्रवास करणार होतो. आम्ही सर्वजण सुखरूप आहोत त्यामुळे चिंता नसावी. नेमकं काय घडलं हेच कळाले नाही. या अपघाताचे कारण आताच सांगता येणार नाही.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पण या घटनेमुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT