Mahad: अपघातात तीन ठार, अपघाताचे दृष्य CCTV मध्ये कैद; पाहा Video  Saam TV
महाराष्ट्र

Mahad: अपघातात तीन ठार, अपघाताचे दृष्य CCTV मध्ये कैद; पाहा Video

हाड तालुक्यातील (Mahad Taluka) बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात (Birbadi Accident) होऊन त्यात तीन मुलांचा मृत्यु झाला.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: महाड तालुक्यातील (Mahad Taluka) बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात (Birbadi Accident) होऊन त्यात तीन मुलांचा मृत्यु झाला. शनिवारी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढालकाठी पुलानजिक हा अपघात झाला. शुभम रमाकांत झांजे वय १५, रा. आकले, हा जागीच विशाल यादव वय १६ आणि आदित्य घाडगे वय १६ असे मयत मुलाची नावे आहेत. हे तीघे एकाच दुचाकीवरुन जात असताना ढालकाठी पुलानजिक दुचाकी घसरली आणि अपघात झाला.

या अपघातात शुभम झांजे याचा डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. तर विशाल याच्यावर महाड रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री मृत्यू झाला आणि आदित्य याला मुंबईत उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघाताची नोंद MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र तीन शाळकरी मुलाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अल्पवयीन मुलांच्या बेदरकार वाहन चालविण्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. यावर पालकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Letter: कामाच्या वेळेत दडलेलं, मनात वाढलेलं न बोललेलं प्रेम, ऑफीसच्या नाहीतर मनाच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र

Zodiac signs: ११ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना अनुकूलता

Kriti Sanon Sister: नुपूर आणि स्टेबिन अडकले विवाहबंधनात; बहिणीच्या लग्नात क्रिती सॅननला अश्रू अनावर

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Maharashtra Politics: राजकीय वाद पेटला! शिंदेंच्या नेत्याच्या घरावर हल्ला, दगडफेक करत कार जाळण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT