kudal Political News Saam tv
महाराष्ट्र

Kudal Politics: 'मोदी सरकार'च्या संकल्प यात्रेचा रथ रोखला, कुडाळमध्ये भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुकी

Vishal Gangurde

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Kudal Political News:

राज्यातील विविध गावागावात केंद्र सरकारच्या संकल्प यात्रेच्या प्रचाराचा रथ जात आहे. मात्र, काही गावात 'मोदी सरकार' उल्लेख असलेल्या या रथाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये घडला आहे. सरकारच्या भारत संकल्प यात्रा रथावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं. (Latest Marathi News)

कुडाळमध्ये जोरदार राडा

'मोदी सरकार'उल्लेख असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाला कुडाळमध्ये रोखण्याचा प्रयत्न झाला. कुडाळ नगरपंचायत आवारात आलेल्या रथाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. रथावर 'मोदी सरकार' असा उल्लेख असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला विरोध केला.

कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुकी

विकसित भारत संकल्प यात्रा रोखण्यावरून भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने दोन्ही गटाला बाजूला केले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 'मोदी हाय हाय'च्या घोषणा दिल्या. या घोषणेच्या प्रत्युत्तरात भाजपकडून 'हरहर मोदी घरघर' मोदीच्या घोषणा देण्यात आल्या.

कोल्हापुरातही रथ अडविण्याचा प्रयत्न

कोल्हापूरच्या राधानगरीतील सोन्याची शिरोली गावात सरकारचा विकिसित भारत संकल्प यात्रेचा रथ काही दिवसांपूर्वी अडवण्याचा प्रयत्न झाला. संविधान संवाद समितीच्या राजवैभव शोभारामचंद्र यांनी रथाच्या समनव्यकर अजित वागरे यांना धारेवर धरलं. यावेळी राजवैभव यांनी यात्रेच्या उद्देशावर अनेक प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT