Nanded Sucide News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

Nanded Sucide News : नांदेडमध्ये मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या मजुराने फुटपाथवरील विद्युत खांबावर चढून तारेला स्पर्श करत आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडच्या वसरनी भागात विद्युत तारेला स्पर्श करून मजुराची आत्महत्या

  • मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेला मजूर, विजेच्या धक्क्याने खाली कोसळला

  • मृत घोषित

  • सीसीटीव्ही फुटेज समोर

आजकाल सातत्याने अनेक आत्महत्येचे भयावह प्रकार समोर येत आहेत. निराशा, ताण यांसारख्या समस्येंमुळे आत्महत्येचे हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढत्या प्रकरणांनी मानवाचा जीव स्वस्त झाला आहे का? हा प्रश्न भेडसावतो. एकीकडे रुग्णालयात मृत्यूला झुंज देणारे, जगण्यासाठी तडफडणारे रुग्ण असतात. तर दुसरीकडे थोड्या थोडक्या कारणांवरून आयुष्याचा दोर कापणारी माणसं असतात. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. खांबावर चढून विद्युत तारेला स्पर्श करून एका मजुराने आत्महत्या केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या वसरनी भागात सदर घटना घडली आहे. खांबावर चढून विद्युत तारेला स्पर्श करून एका मजुराने आत्महत्या केली.विद्युत तारेला स्पर्श केल्याने मजूर खांबावरून खाली पडला. सदरील मजूर मध्यप्रदेश मधून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आल्याची माहिती आहे.पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमी मजुराला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, एक व्यक्ती फुटपाथवर असलेल्या एका खांबावर चढतो. आजूबाजूने जाणारे नागरिक त्याच्याकडे पाहतात. मात्र त्याला कोणीही रोखत नाही. काही मिनिटांनंतर संबंधित व्यक्ती खांबावर पोहचली आणि सेकंदातच खाली कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून या व्यक्तीबाबत आणि घटनेसंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

तुमच्या महापालिकेत महापौर कोण? 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

SCROLL FOR NEXT