Husband Kills wife Saam Tv
महाराष्ट्र

Husband Kills wife: चहा उशिरा दिल्याने नवरा भडकला; रागाच्या भरात बायकोची केली हत्या

Husband Kills wife: चहा करायला उशीर झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Husaband Wife News: भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. भारतात आता कोणत्याही शहरात आता १०हून अधिक चहाच्या टपऱ्या असतात. भारतातील चहाप्रेमी व्यक्ती दिवसभरात चार-पाच कप चहा सहज पितात. याच चहामुळे हादरवणारी घटना घडली आहे. चहा करायला उशीर झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये चहाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केलीची धक्कादायक घटना घडली आहे. ग्वाल्हेरच्या युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हत्येची घटना घडली आहे.

साधना रजकचा विवाह हा दोन वर्षांपूर्वी मोहित रजक राहत हिच्याशी झाला होता. गेल्या ६ महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद व्हायचे. मोहित हा पत्नी साधनाला रोज मारहाण करायचा. अनेकांनी या दोघांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा या नात्यात नेहमी वाद व्हायचे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोहितने पत्नी साधनाला चहा बनवायला सांगितला होता. मात्र, त्यादरम्यान, दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे साधनाला चहा बनवण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे नवरा मोहित खूप भडकला. त्याने पत्नीचा गळा दाबला. यामुळे पत्नी साधनाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपासणी करत आहे.

आरोपी पतीला अटक

पत्नी साधनाने चहा बनविण्यास उशीर झाल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला. पती मोहितने पत्नीला बेदम मारहाण केली. पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. तर मृत साधनाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT