Nitin Gadkari on Road Accident : ट्रक, बस दरीत कोसळून अपघात होणार नाहीत, नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

Accident News : नितीन गडकरी यांनी सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा वापर काही भागांत करण्याचा विचार करत आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari saam tv
Published On

Delhi News : घाटात वाहन किंवा ट्रक दरीत कोसळून होणाऱ्या अपघातांचा संख्या मोठी आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ट्रक आणि वाहनांमुळे महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. राज्यसभेत गुलाम अली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा वापर काही भागांत करण्याचा विचार करत आहे.

गुलाम अली यांनी म्हटलं की, सध्याचे सरकार काश्मीरमध्ये खूप काम करत आहे. मात्र महामार्गांवर ट्रकचे अपघात वाढत आहेत. इतका मोठा ट्रक दरीत घसरला आणि खाली पडला की मग जवळच्या हायड्रो प्रकल्पामुळे ट्रक किंवा मृतदेह सापडत नाही.

Nitin Gadkari
Loksabha Speaker Om Birla : लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्लांनी जाहीर केलं; काय आहे कारण?

राष्ट्रीय महामार्गावर डोड्डा ते किश्तवाड आणि उधमपूर ते श्रीनगर या मार्गावर अपघाती क्रॅश बॅरिअर्स बसवण्याची विनंती मी मंत्र्यांना करेन, त्यामुळे अपघात थोडे कमी होऊ शकतील, असं गुलाम अली यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, डोंगराळ भागात अपघात होतात हे खरे आहे. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही. (Political News)

Nitin Gadkari
Haryana Clashes News: 'द्वेषपूर्ण भाषण केलं तर...' हरियाणा हिंसाचाराच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनावरुन सुप्रीम कोर्टाचा इशारा

ट्रक दरीत कोसळण्याऐवजी आपला मार्ग बदलतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात, असे प्रयोग आम्ही काही ठिकाणी केल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com