Former Congress MLA Madhavrao Patil Javalgavkar addresses party workers amid speculation of joining BJP. saam tv
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

Madhavrao Patil Javalgavkar BJP Joining News Nanded: नांदेडमधील काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपमध्ये जाणार का? त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. २६ जूनच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना जवळगावकर यांनी काँग्रेसमध्ये राहिल्याची खंत व्यक्त केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आज आमदार राहिलो असतो, असं वक्तव्य त्यांनी केलं.

दरम्यान, आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवत असून २६ जून रोजी हदगाव येथे महत्त्वाची बैठकही त्यांनी बोलावली आहे. हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान आता जवळगावकरही भाजपमध्ये प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेत बोलताना जवळगावकर म्हणाले, अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आज आमदार राहिलो असतो.

मात्र, काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने पक्ष सोडला नाही अस ही जवळगावकर म्हणाले. माधवराव पाटील जवळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार की काँग्रेसमध्येच राहणार, याचा फैसला आता कार्यकर्त्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हदगावच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार गळाला लावल्यानंतर आता भाजप देखील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर हे देखील शिंदेसेनेत जाणार असल्याने नांदेडमध्ये देखील विरोधी बाकावर असलेले नेते आता सत्ताधारी बाकावर बसण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT