उदयनराजेंना मागे टाकत माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर मंत्रीपदाच्या वाटेवर ? SaamTv
महाराष्ट्र

उदयनराजेंना मागे टाकत माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर मंत्रीपदाच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीच्या तिकिटावर विक्रमी मतांनी निवडून येऊन लोकसभेच्या सदस्यत्वाचा त्याग करून उदयनराजे भाजपवासी झाले. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी दारुण पराभव केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम .

सातारा - राष्ट्रवादीच्या तिकिटावर विक्रमी मतांनी निवडून येऊन लोकसभेच्या सदस्यत्वाचा त्याग करून उदयनराजे भाजपवासी झाले. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी दारुण पराभव केला. भाजपने त्यांचे पुनर्वसन करून राज्यसभा देखील बहाल केली.

मात्र खा.उदयनराजे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सपशेल डावलले असून भाजप मध्ये प्रवेश करतेवेळी जी आश्वासने खा.उदयनराजे यांना देण्यात आली होती, त्यांचा विसर आता केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला पडला आहे. अशी चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. Madha MP Ranjitsinh Nimbalkar on the way to the post of Minister, leaving Udayan Raje behind

हे देखील पहा -

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि युवकांमध्ये असलेली उदयनराजेंची क्रेझ या सगळ्या गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी मधून निवडून आलेल्या खा.उदयनराजे भोसले यांना भाजपने मोठ्या प्रयत्नाने भाजपमध्ये समाविष्ट करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा गाजावाजा केला गेला.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थिती मध्ये उदयनराजे भाजपवासी झाले. लोकसभेची पोट निवडणूक पुन्हा लागल्या नंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. मात्र उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्याने उदायनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. परंतु उदयनराजेंना पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चा ही जोरदार रंगल्या होत्या.

मात्र आता जो केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होत आहे त्यामध्ये खा.उदयनराजे भोसले यांना कुठंही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले  आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. खा.उदयनराजे यांची आक्रमक शैली, त्यांची अनोखी क्रेझ यामुळे राज्यातील राजकारणात त्यांचा एक वेगळाच दबदबा आहे.

राष्ट्रवादी मध्ये असताना उदयनराजे भोसले यांच्या याच क्रेझमुळे पक्षामध्ये अंतर्गत विरोध असून सुद्धा कुणालाही न जुमानता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या पाठीशी उभे होते. परंतु आता भाजपला उदयनराजे यांच्या या नेतृत्वाचा विसर पडला असल्याचे चित्र दिसत आहे. उदयनराजे यांना डावलून पहिल्यांदाच खासदारकीची माळ गळ्यात पडलेले माढ्याचे खासदर रणजित निंबाळकर याना आता मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे भाजप उदयनराजे यांना महाराष्ट्रात भाजपचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानकपणे मंत्रिपद शर्यतीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT