Lonavala News Saam TV
महाराष्ट्र

Lonavala News: लोणावळ्यात विषबाधेमुळे तब्बल १५० शेळ्यांचा मृत्यू ; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर

150 Goats and Sheep Dies: मेंढपाळ त्याच्या मेंढ्यांना मोकळ्या मैदानात घेऊन आला. त्यानंतर त्याने सर्व शेळ्या आणि मेंढ्यांना चरण्यासाठी सोडलं. यावेळी या शेळ्या मेंढ्यांनी कुजलेले किंवा खराब झालेले अन्न पदार्थ त्याठिकाणी खाल्ले.

Ruchika Jadhav

दिलीप कांबळे

Lonavala News:

लोणावळ्यात विषबाधेमुळे तब्बल १५० शेळी आणि मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोणावळा येथे एका मोकळ्या मैदानात मेंढपाळ आपल्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन आला होता. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने, मेंढपाळावर आर्थिक संकटही ओढावलं आहे.

मेंढपाळ त्याच्या मेंढ्यांना मोकळ्या मैदानात घेऊन आला. त्यानंतर त्याने सर्व शेळ्या आणि मेंढ्यांना चरण्यासाठी सोडलं. यावेळी या शेळ्या मेंढ्यांनी कुजलेले किंवा खराब झालेले अन्न पदार्थ त्याठिकाणी खाल्ले. त्यानंतर त्या मेंढ्यांना त्रास होऊ लागला.

तातडीने त्या ठिकाणी पशुधन अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी या शेळ्या मेंढ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. मात्र काही शेळ्या मेंढ्या उपचारापूर्वीच तर काही उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्या. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात या १५० शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेंढपाळ त्याचा उदनिर्वाह या शेळ्यांवरच करत होता. अचानक सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. एखाद्या बाळाप्रमाणे मेंढपाळ त्यांना पाळत होता. त्यांची काळजी घेत होता. एकाएकी आपल्या शेळ्यांचा मृत्यू होईल अशी कल्पनाही त्यांच्या मनात आली नव्हती. मात्र या घटनेमुळे मेंढपाळावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT