lonavala bhushi dam Saam Tv News
महाराष्ट्र

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

Lonavala Viral News: लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पर्यटकाने खुलेआम लघवी केली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत टीका केली.

Bhagyashree Kamble

  • लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पर्यटकाने खुलेआम लघवी केली

  • हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल

  • नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत टीका केली

  • सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चा आणि प्रश्न निर्माण झाले

पावसाळी पिकनिकसाठी मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पहिली पसंती असलेला लोणावळ्यातील भुशी डॅम नेहमीच गर्दीने फुललेला असतो. पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र, याच ठिकाणी एक किळसवाणा प्रकार घडला आहे. तरूणानं नको ते कृत्य केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी पर्यटक भुशी डॅमला भेट देतात. पण याच भुशी डॅमजवळ एका तरूणाकडून किळसवाणा प्रकार घडला आहे. भुशी डॅमजवळील प्रवाहात पर्यटक आनंद घेत असतानाच एक पर्यटक लघवी करत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किळसवाणा प्रकार सुरू असतानाच एक व्यक्ती त्या तरूणाच्या जवळ उभा होता. यादरम्यान, त्यानं हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे पर्यटकाच्या या कृत्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नेटकऱ्यांनी तरूणाच्या व्हायरल व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. एकानं, 'निसर्ग तुमचा शौचालय नाही', अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एकानं 'हे तुमच्या खासगी शाळेचं मैदान नाही. जागेचा आदर करायला शिका', अशी कमेंट केली आहे. सध्या तरूणाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: नांदेड-लोहा माहामार्गावर कार पलटी होऊन दोघे जखमी

Chanakya Niti : तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाणक्यांचे हे विचार १००% ठरतील प्रेरणादायी

Shocking : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी कृत्यानंतर कौर्याची सीमाच ओलांडली, शहरात खळबळ

Rasmalai Chocolate Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर, झटपट तयार करा टेस्टी रसमलाई चॉकलेट

SCROLL FOR NEXT