Lonavala Travel Alert  Saam Tv
महाराष्ट्र

Lonavala : लोणावळ्यात व्हिला बुक करताय तर सावधान, ऑनलाईन स्कॅमद्वारे पर्यटकांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

Lonavala Travel Alert : लोणावळ्यात ऑनलाईन व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक करणारा मोठा स्कॅम उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती देऊन आगाऊ पैसे घेतले जातात आणि प्रत्यक्षात व्हिला अस्तित्वात नसल्याचे समोर येत आहे.

Alisha Khedekar

  • लोणावळ्यात ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस

  • पर्यटकांकडून २०-२५ हजारांची आगाऊ रक्कम घेतली जाते

  • सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचा वापर

  • प्रत्यक्ष ठिकाणी व्हिला अस्तित्वात नसल्याचे समोर येते

  • पर्यटकांनी अधिकृत वेबसाईट्सवरूनच बुकिंग करण्याचे आवाहन

दिलीप कांबळे, मावळ

यंदाच्या सुट्टीत फिरायला जात असाल, तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी. पर्यटन नगरी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाइन भामटे सक्रिय झाले आहेत.

लोणावळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची ऑनलाइन लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुकिंगच्या नावाखाली २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते. इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहेत.त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे.

ऑनलाईन बुकिंग करताना काय काळजी घ्याल?

  • शक्यतो ऑनलाईन बुकिंग टाळा

  • ऑनलाईन बुकिंग करत असाल तर वेबसाइटबद्दल पूर्ण खात्री करून घ्या

  • संपूर्ण माहिती प्राप्त झाल्याशिवाय कोणतेही व्यवहार करू नका

  • ऑनलाईन दिसणाऱ्या सुंदर फोटोंना बळी पडू नका

  • कोणतीही शंका आल्यास पोलीस ठाण्यात त्याबद्दल माहिती द्या

  • एखादा स्कॅम झाल्यास घाबरून न जाता सतर्कतेने पोलीसांची मदत घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, SIT चौकशीदरम्यान छातीत दुखू लागलं; नंतर रुग्णवाहिका बोलावली

Ratnagiri Tourism : लाल दगड अन् ब्रिटिश काळातील तोफ, 'हा' किल्ला जपतोय सागरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव

Bigg Boss Marathi 6 Winner : मराठीनंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉस गाजवणार? स्वतः केला मोठा खुलासा

बोअरवेलफेम 50 तास मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्स झाला 25 वर्षांचा

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT