तीन राज्यात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेत्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढलाय. या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप आमदाराची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लवकर होतील, असे संकेत देण्यात आलेत. (Latest News)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित होते. आचारसंहितेला फक्त ५५ दिवस बाकी आहेत. आमदारांनी कामाला लागावे असे, आदेश यावेळी देण्यात आलेत. भाजप आमदारांच्या बैठकीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशात लवकरच लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी आता फक्त ५५ दिवस उरलेत. तुम्ही सर्वांनी कामाला लागा, असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणालेत. भाजपने लोकसभेची तयारी सुरू केलीय. यापार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांना एक टास्क दिलाय. आमदारांना आपल्या मतदारसंघात कमीत कमी ३० हजार नमो अॅप्स डाउनलोड करून घेण्याचे टास्क देण्यात आलेत.
तसेच आमदारांनी दररोज साधरण पाच मिनीटं नमो अॅपवर घालावीत. जे आमदार अॅपवर वेळ घालवणार नाहीत त्यांचा रिपोर्ट हा राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिला जाईल अशी तंबी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी आमदरांना दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.