Lok Sabha Election Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : महायुतीचं ठरलं! पुढील ४८ तासांत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय

Lok Sabha Seat Formula : भाजप २६ ते २८ जागांवर निवडणूक लढवेल, असं म्हटलं जात आहे. पुढील ४८ तासांत महायुतीच्या लोकसभा जागांच्या फॉर्म्युलावर अंतिम निर्णय सार्वजनिक होईल,असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सूरज मसूरकर, मुंबई)

BJP, NCP, Shiv Sena Mahayuti Lok Sabha Seat Formula :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. आता राज्यातील जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. येत्या ४८ तासात हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील जागा वाटपाविषयी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक निर्णय झालाय.(Latest News)

अमित शाह यांच्या बैठकीतील तोडगा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे. भाजप विद्यमान खासदारांच्या जागा भाजप मित्र पक्षांना सोडणार आहे. सर्वेक्षणानंतर शिवसेनेला १५ ते १६, तर राष्ट्रवादीला ५ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शिवसेना लोकसभेच्या २२ तर अजित पवार यांना १० ते १२ जागा हव्यात अशी माहिती समोर आलीय. तर भाजप ३२ जागा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

आज अमित शाह (Amit Shah) यांच्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा झाली असून भाजप (BJP) २६ ते २८ जागांवर निवडणूक लढवेल असं म्हटलं जात आहे. पुढील ४८ तासांत महायुतीच्या लोकसभा (Lok Sabha) जागांच्या फॉर्म्युलावर अंतिम निर्णय सार्वजनिक होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जागा वाटपाबाबत आपली प्रतिक्रिया दिलीय. तुमच्या फॉर्मुक्यवर मी काय बोलणार. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला पाहिजे. आम्हाला विश्वास असून आम्हाला दिलेला शब्द पाळला जाईल. निवडून येणं हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. राज्यात ४५+ जागा निवडून आणत पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi )यांचे स्वप्न साकार करायचे असल्याचं भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT