प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार आणि शिंदे गट लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. (Latest News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आमची राजकीय मैत्री फक्त विकास कामासाठी आहे, आमची राजकीय बांधिलकी कोणासोबत नाही. आमची राजकीय बांधिलकी जनता आहे ते म्हणेल तर त्यांच्यासोबत जाऊ, असंही ते म्हणालेत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभा निवडणुकीवरुन बोलताना बच्चू कडू यांनी राजकीय खळबळ उडवून देणारा दावा केलाय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा भेटेल? भाजप अजित पवार यांना देईल की शिंदे गट देईल? किंवा होऊ शकते की भाजपचं सगळ्याच जागा लढवेल फक्त माणसं शिंदे आणि अजित पवारचे राहतील, आणि चिन्ह कमळ राहू शकते, असा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेने 18 जागा लढवल्या होत्या आणि आता जर भाजप 35 जागा लढवत असेल तर मग शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे की नाही? सोबत घेऊन जर बगलीत दाबून ठेवाल तर बिचवा काढायची वेळ याला नको असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.
आमची मानसिकताच नाही
लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे. विधानसभेची बोलणी नाही तर मग 400 पार च्या वाट्यात आमच्या काय संबंध येतो. महायुतीच्या बैठकींचं मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही. सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही, आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोलामध्ये निवडणूक लढू असं बच्चू कडू म्हणालेत.
नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्याला पकडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानमधून ओढून आणलं पाहिजे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकीत असेल तर मग कायदा कुठे राहिला. निवडणुका आहे म्हणून एका धर्माला टार्गेट केलं जातं. निवडणुका जवळ आहे तर हिरवा, भगवा निळा झेंडा बाहेर येईल, असंही ते म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.