Jalgaon News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News: जळगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; 400 कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Lok Sabha Election : जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल रात्री बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय.

Ruchika Jadhav

संजय जाधव

राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशात निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल रात्री बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि शरद पवार गटाची साथ सोडली आहे. शरद पवार गट आणि ठाकरे गटातील तब्बल 400 कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

पक्षप्रवेशावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार चिमणराव पाटील देखील उपस्थित होते. जवळपास 60 ते 70 वाहनातून कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले होते. बुलढाणामधील रेसिडेन्सी क्लब येथे सदर पक्षप्रवेश पार पडला. यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणि शदर पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,निवडणुकीच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी आम्ही दररोज सर्व माहिती घेतो. प्रलंबित कामांसाठी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेत त्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत असतो. आपलं सरकार सामान्य जनतेचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT