Lok Sabha Election 2024 Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीच्या तारखेची उद्या घोषणा

Lok Sabha Election Date Announcement : निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात येणार आहे.

Ruchika Jadhav

Election Commission :

लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली.

निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. याव्यतिरिक्त किती टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे? कोणत्या राज्यांत आधी आणि कोणत्या राज्यांत नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT