Lok Sabha Election Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाजपातील मतभेद ऐन निवणुकीच्या तोंडावर समोर; अकोल्यात बंडखोरी होण्याची शक्यता

Akola Constituency : दरम्यान, भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर बंडोखरी करणार असून लवकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत. आज इतर जिल्ह्याच्या तुलनेत

साम टिव्ही ब्युरो

अक्षय गवळी

Akola News :

राज्यात लोकसभा निवडणुकांची जय्यद तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष हळूहळू विविध मतदारसंघांवर दावा करत आपल्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या आठ याद्या जाहिर केल्यात. अकोल्यात भाजपकडून अनूप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झालीये. त्यानंतर नारायण गव्हाणकर नाराज असून बाहेर पडतील असं म्हटलं जातंय.

अकोल्यात भाजपातील मतभेद ऐन निवणुकीच्या तोंडावर समोर आलेत. अकोल्यात भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर हे बंडखोरी करणार अशा चर्चा आहेत. तिकीट वाटपावरुन ते भाजपवर नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनूप धोत्रे यांना उमेदवारी जाहिर झालीये. उमेदवारीसाठी एक नाव नेहमीचं चर्चेत राहलं ते नाव होतं भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचं. अनूप धोत्रेंना उमेदवारी जाहिर झाल्यानं आज गव्हाणकर हे भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर बंडोखरी करणार असून लवकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत. आज इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्याचा विकास घसरलाय. गव्हाणकरांनी भाजपच्या निर्णयावर स्पष्टच बोलून दाखवलं.

एकेकाळी बाळापूर विधानसभेत गव्हाणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तेव्हा भाजपचा पराभव झाला होता. आता पुन्हा तिच स्थिती निर्माण झाल्यास कुठेतरी भाजपाला फटखा बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

Kisan Credit Card: ५ लाखांचं कर्ज अन् फक्त ४ टक्के व्याजदर; बळीराजासाठी सरकारची योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT