Lok Sabha Election 2024 Results Today Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल, दिग्गजांचं भवितव्य पणाला; महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला?

Lok Sabha Election 2024 Results Today : लोकसभा २०२४ निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला असणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडलं. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. आज मंगळवारी(४ जून) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुकांचे निकाल जवळपास पूर्णत: स्पष्ट होईल. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल.

त्याचबरोबर काही भागात विशेष पथकाच्या तुकड्या देखील तैनात राहतील. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार, की इंडिया आघाडी मोठा उलटफेर करणार? याकडे सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय मतमोजणी दरम्यान संपूर्ण देशातील नागरिकांच्या नजरा महाराष्ट्राकडे असतील. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी तसेच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात कर्मचाऱ्यांना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

मतमोजणीपूर्वी वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले आहेत. जवळपास सर्वच पोलमध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात NDA ला जवळपास ३५० हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीला १२० ते १५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर ३५ ते ४० जागा अपक्ष उमेदवारांना मिळू शकतात, असं एक्झिट पोलद्वारे सांगण्यात आलं आहे.

मविआ की महायुती, महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

एक्झिट पोलची महाराष्ट्रातील आकडेवारी बघितली, तर राज्यात महायुतीला २४ ते २८ जागा आणि महाविकास आघाडीला २० ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवला आहे. भाजपला सर्वाधिक १८ जागा, त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे १२ जागा, काँग्रेसला जवळपास ९ जागा आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय १ जागा अपक्षाला मिळू शकते, अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असं एक्झिट पोलच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT