Eknath SHinde- Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम, शिवसेना १६ जागांवर ठाम

Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेने भाजपकडे १८ जागांची मागणी केली असून १६ जागांवर ठाम आहे.

Ruchika Jadhav

Political News :

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णत: सुटलेला नाही. अशात महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भाजपकडे १८ जागांची मागणी केली असून १६ जागांवर ठाम आहे.

शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा?

ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये घासाघीस सुरु आहे. वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. या मदतारसंघावर शिवसेनेकडून दावा केला जातोय. मात्र या जागांवरून भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू आहेत. अशात शिवसेनेकडून १६ जागांचा आग्रह केला जातोय. यात जर मनसे देखील महायुतीत सहभागी झाल्यास महायुतीच्या शिवसेनेतूनच मनसेला जागा दिल्या जातील असं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आणखी कमी जागा येण्याची शक्यता आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटातील माजी खासदार

1. श्रीकांत शिंदे - कल्याण

2. राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई

3. हेमंत पाटील - हिंगोली

4. श्रीरंग बारणे - मावळ

5. राजेंद्र गावित - पालघर

6. गजानन कीर्तीकर - वायव्य मुंबई

7. संजय मंडलिक - कोल्हापूर

8. हेमंत गोडसे - नाशिक

9. प्रतापराव जाधव - बुलडाणा

10. धैर्यशील माने - हातकणंगले

11. सदाशिव लोखंडे - शिर्डी

12. कृपाल तुमाणे - रामटेक

13. भावना गवळी - यवतमाळ-वाशिम

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचे दिल्ली दौरे वाढले आहेत. त्यामुळे मनसे महायुतीचा नवीन घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे. अशात आज किंवा उद्यापर्यंत याबाबतची माहिती जाहीर केली जाईल असं म्हटलं जातंय. जर मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला तर मनसेला २ किंवा ३ जागा दिल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

SCROLL FOR NEXT