Lok Sabha Election 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! कोल्हापुरात मविआला सापडला लोकसभेसाठी तगडा उमेदवार ? शिंदे गटाला देणार कडवी टक्कर

Lok Sabha Election 2024: कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यातच आपण कोल्हापूरमधून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं मत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी कोल्हापुरात व्यक्त केलं.

Sandeep Gawade

रणजीत माजगावकर

Lok Sabha Election 2024

देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार होत आहे. राज्यातही त्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक जण लोकसभेच्या तयारीला लागलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा या शिंदे गटाच्या शिवसेनेकडे सध्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यातच आपण कोल्हापूरमधून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं मत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी कोल्हापुरात व्यक्त केलं. त्यामुळे कोल्हापुरातील लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीसोबत स्वराज्य संघटना अशी सांगड घालत युवराज संभाजीराजे छत्रपती आगामी लोकसभेसाठी तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांसोबत बोलताना आपण लोकसभा कोणत्या मतदारसंघातून लढवणार असा प्रश्न युवराज संभाजीराजे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपणाला कोल्हापूर अधिक प्रिय आहे असं म्हणत जणू कोल्हापुरातून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहेत. संभाजीराजे महाविकास आघाडी सोबत जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र त्यांची चर्चा स्थानिक अथवा राज्यातील नेत्यांशी झालेली नाही, तर त्यांची चर्चा थेट दिल्लीतून झाल्याचेही त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची जागा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. मात्र ही जागा कोणाला जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सरप्राईज उमेदवार असेल असे जाहीर केलं होतं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कोल्हापूर लोकसभेचे वातावरण जागा वाटपाआधीच तापू लागलं आहे.

स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. यामुळे संभाजीराजे छत्रपती हे नाशिकमधून की कोल्हापूरमधून मैदानात उतरणार? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. संभाजीराजे छत्रपती आता कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT