Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde : माझ्यावर टीका करण्यासाठी जातीचं अस्त्र उगारलं जातंय; पंकजा मुंडेंचं विरोधकांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : त्यांवर ते जे काही बोलतात, त्याच्यापाठीमागे कुणीतरी मोठी व्यक्ती असते. यामुळे लोकांमध्ये काहीशी नकारात्मकता पसरू नये हीच भीती वाटते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

विनोद जिरे

Political News :

भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अफवांची भीती वाटतेय. मला निवडणुकीचं नाही, तर अफवाचं आव्हान आहे, मला त्याची भीती वाटते. माझ्यावर टीका करण्यासाठी जातीचं अस्त्र उगारलं जातंय, असं पंकजा मुंडेंनी स्वत: माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

पंकजा मुंडे आज बीडच्या नारायणगडावर आल्या होत्या. येथे नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. साम टीव्हीशी बोलताना ही माझी अग्निपरीक्षा आहे, असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला.

काही व्यक्ती एखादं युट्यूब चॅनल काढतात. त्यावर ते जे काही बोलतात, त्याच्यापाठीमागे कुणीतरी मोठी व्यक्ती असते. यामुळे लोकांमध्ये काहीशी नकारात्मकता पसरू नये हीच भीती वाटते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रचंड उत्साहात लोकांनी माझं स्वागत केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये विविध चर्चा, शंका आणि अस्वस्थता होती, मात्र कालपासून ती दिसत नाही. नेहमी नारायण गडाचे दर्शन घेऊनच साहेब निवडणूक लढवायचे, ती परंपरा मी देखील ठेवली आहे. मी या गडाची नात आहे, त्यामुळं मी नेहमी येते.

कुणीतरी मागून जातीचे अस्त्र उगारले

निवडणुकीमध्ये विरोधकांसमोर आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी काहीच बोलता न येणे हे फार मोठं आव्हान असतं. मी आतापर्यंत पालकमंत्री असताना विकास केला, सर्व समाजाला न्याय दिला, त्यामुळे माझ्या विरोधात बोलायला काहीच नसल्याने माझ्यावर टीका करणार तरी काय? यामुळे माझ्यावर टीका करण्यासाठी कुणीतरी जातीचे अस्त्र उगारले असेल तर ते याआधी देखील अनेकवेळा उगारले गेले आहे. मात्र या पुरोगामी जिल्ह्याच्या लोकांनी नेहमी योग्य व्यक्तीला निवडलं आहे. जो नेता या जिल्ह्याला दिशा देईल तो नेता माझ्या रूपाने निवडतील, असा मला विश्वास आहे, असंही त्या ठामपणे म्हणाल्या.

दरम्यान, निवडणूक हे एक युद्ध असतं आणि युद्ध हे लढावं लागतं. युद्धात हरजित होत असते, त्यामुळं माझ्याकडे जिंकण्याचा आणि हरण्याचा अनुभव जमा झाला आहे. मला नेहमीच अग्निपरीक्षा द्याव्या लागतात, असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOB Recruitment: इंडियन ओवरसीज बँकेत सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

Maharashtra Weather : मुंबईत रेड अलर्ट, पुण्यात पूरस्थिती; पुढील चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान

SCROLL FOR NEXT