लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहाथ अटक SaamTVnews
महाराष्ट्र

लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहाथ अटक

संघटनेच्या अध्यक्षासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लोकनायक संघटनेच्या (Loknayak Sanghatana) कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) माहिती मागवून त्याआधारे खंडणी मागितली. लातूर (Latur) पोलिसांनी खंडणी घेताना संघटनेच्या कार्यकर्त्यास रंगेहात अटक केली आहे. यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. उर्वरित तिघे अद्यापही फरार आहेत.

हे देखील पाहा :

लातूरमध्ये एका कनिष्ठ विद्यालयाचे अनुदान मूल्यांकन झाले असून सदरील मूल्यांकनाची एक कॉपी लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात काढून घेतली. सदरची फाईल चुकीची आहे. ती फाईल मंजूर होऊ देणार नाही, तुला ऑफिसलाही फिरू देणार नाही, तुला व तुझ्या कुटुंबियांना ठार मारू अशी धमकी देऊन लोकनायक संघटनेचे भाऊ उर्फ महादू रसाळ, किरण पाटील, सर्फराज सय्यद आणि मुक्तार शेख हे गेल्या आठ महिन्यापासून त्रास देऊन खंडणीची मागणी करत होते असा आरोप फिर्यादीने दिला आहे.

दरम्यान, आरोपींनी एक महिन्यापूर्वी फिर्यादी कडून 80 हजार रुपये खंडणी घेतली होती. आरोपी काही दिवसानंतर पुन्हा खंडणीची मागणी करू लागले. आज फिर्यादीस फोन करून सराफ लाइनच्या बाजूला असलेल्या त्यांच्या कार्यालयात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलावून घेतले व तेथे 2 लाख 75 हजार रुपयाची खंडणी मागितली असा तक्रारी अर्ज फिर्यादीने दिला आहे.

त्यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस ठाणे गांधी चौक येथे किरण पाटील, सर्फराज सय्यद, भाऊ उर्फ महादू रसाळ, मुक्तार शेख यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीस खंडणीची मागणी करून खंडणीची रक्कम गुळमार्केट ते शाहू चौक जाणाऱ्या रोडवरील एका पान टपरीवर घेऊन येण्यास सांगितले होते.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. मागणीप्रमाणे खंडणी मधील रक्कम स्वीकारताना लोकनायक संघटनेचा कार्यकर्ता किरण पाटील यास पंचा समक्ष सपोनि दयानंद पाटील यांच्या पथकाने खंडणीच्या रकमेसह ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आरोपी गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT