अहमदनगर ः राज्यातील इतर जिल्ह्यांतील कोरोना स्थिती आटोक्यात येत असली तरी नगर जिल्ह्यातील धोका वाढत आहे. संगमनेर आणि पारनेर तालुके हॉटस्पॉट बनले आहेत. हे तालुके जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. पारनेरजवळ पुणे जिल्ह्याची तर संगमनेरला पुणे आणि नाशिक जवळ आहे. दोन्ही जिल्ह्यांतील लोकांची आवक-जावक असते. हे दोन्ही तालुके हॉटस्पॉट बनू पाहत आहेत.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संगमनेरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी लोकांना सजग राहण्याचे आवाहन केले होते. रूग्ण संख्या कमी नझाल्यास लॉकडाउन लावण्याचाही इशारा दिला होता. राज्यात आज सर्वत्र शाळा सुरू होत आहेत. मात्र, दुसरीकडे नगर जिल्ह्यातील स्थिती भयावह बनू पाहत आहे.Lockdown of 61 villages in Nagar district ABN79
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेत या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात रूग्ण होते. आताही तेथेच संख्या जास्त आहे. Lockdown of 61 villages in Nagar district ABN79
अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 61 गावे ही लॉकडाऊन जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे या गावातील मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. आज राज्यात सर्वत्र शाळा सुरू होणार आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावतील शाळा या बंद राहतील .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.