dahanu virar Local Train News  Saam tv
महाराष्ट्र

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

dahanu virar Local Train News : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत झाली आहे. लोकल बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Vishal Gangurde

डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये पालघर स्थानकावर तांत्रिक बिघाड

प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिघाड दुरुस्तीचे काम

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरु

रुपेश पाटील, साम टीव्ही

मुंबईकरांची लाईफलाइन अशी ओळख असलेली लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झाला आहे. पालघर रेल्वे स्थानकावरील लोकलमध्ये हा बिघाड झाला आहे. त्यामुळे पालघरहून विरारच्या दिशेनेच्या जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय. ऐन गर्दीच्या वेळी लोकलमध्ये बिघाड झाल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना खोळंबा झालाय. लोकल बिघाडामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, विरारकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरु आहेत. रेल्वे स्थानकावरून गाडी सुटताना व्हायब्रेट होत असल्याची माहिती मिळत आहे.

डहाणू-विरार मार्गावरील पालघर रेल्वे स्थानकावरून सांयकाळी पाच वाजून पंचेचाळीसची सुटणारी लोकल होती. याच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या लोकलमध्ये बिघाड झाल्याने मोठ्या संख्येने प्रवासी स्थानकावर उभे आहेत. काही प्रवासी ट्रॅकवर उभे असल्याचे दिसत आहे.

लोकलमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाड शोधण्यास सुरुवात केली. या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गाडी सुटताना व्हायब्रेट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुढील बिघाड दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाऊण तासांनी डहाणू-विरार रेल्वे सेवा सुरळीत सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू

Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

Eyeliner Tips : 'आयलाइनर'शिवायही तुमचे डोळे सुंदर अन् रेखीव दिसतील; ट्राय करा 'या' सिंपल मेकअप ट्रिक्स

Maharashtra Live News Update : अशोक खरातची कोठडी आज संपणार

Dhurandhar 2 : झुकेगा नहीं साला! 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, ५व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT