Supreme Court  Saam Tv
महाराष्ट्र

Local Body Election Result: मोठी बातमी! नगरपालिका- नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरलाच - सुप्रीम कोर्ट

Supreme Court On Local Body Election Result: सुप्रीम कोर्टाने आज नगरपालिका- नगरपंचायतीच्या निकालाबाबत मोठा निर्णय दिला. नगरपालिका- नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होऊन निकाल लागेल. सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निकाल कायम ठेवला.

Priya More

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होतील असे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले होते. नागपूर खंडपीठाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाचे निकाल २० डिसेंबरच्या मतदानापूर्वी म्हणजेच २१ डिसेंबरच्या निकालाआधी जाहीर करण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल पुढे-मागे होणार नाही. तर २१ डिसेंबरच्या दिवशीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल असे स्पष्ट केले. कोर्टाने २१ डिसेंबरपूर्वी मतमोजणी करण्यास नकार दिला. तसंच, हायकोर्टातील विविध याचिका, प्रकरणाचा आणि खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत असे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत कडक भूमिका घेत या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नये असे सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट सांगितले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीच्या आतच होतील हे निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पायलटच्या सुट्ट्यांबाबत डीजीसीएचा मोठा निर्णय!

कल्याणमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली, अनेक भागातील पाणी पुरवठा बंद

Rava Cake: ख्रिसमससाठी बनवा मऊ रवा केक, तोंडात टाकताच विरघळेल

Pune : पुणेकरांना दिलासा! चाकण, शिरूर, रावेत, नऱ्हे, हडपसर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, उन्नत मार्ग अन्... ; काय आहे नेमका प्लान?

काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT