Balasaheb thorat Saam TV
महाराष्ट्र

Live Update: साहेबांनाही माझी काळजी वाटायला लागली; बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रींचे वक्तव्य चर्चेत

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता.

साम टिव्ही ब्युरो

साहेबांनाही माझी काळजी वाटायला लागली; बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रींचे वक्तव्य चर्चेत

मी गेल्या काही महिन्यांत अनेक सप्ताहांमध्ये भाषणं केली. आता साहेबांनाही (वडील बाळासाहेब थोरात ) काळजी वाटायला लागली की, माझी पोरगी प्रवचनकार होते की काय? असं जयश्री थोरात म्हणाल्या. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयश्री थोरात बोलत होत्या.

बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार असतील तर स्वागतच आहे : चंद्रशेखर बावनकुळे

बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये येणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. बाळासाहेबांसारखे नेते दुखावत असतील तर, काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

लोकांना जे आवडतं ते नेत्यांना करावं लागतं : सत्यजित तांबे

एक काळ असा होता राजकारण, सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी दिशा ठरवायचे आणि लोक ते बघून काम करायचे. आता जमाना बदललाय आणि लोकांना जे आवडतं ते नेत्यांना करावं लागतं, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सत्यजित तांबे म्हणाले. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा केक भाचे सत्यजित तांबेंनी कापला. त्यावेळी तांबेंनी हे वक्तव्य केले.

जालना: बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेस हायकमांड योग्य आणि लवकर निर्णय घेतील: विजय वडेट्टीवार

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील. या राजीनाम्याबाबत वरिष्ठ तातडीने निर्णय घेतील, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांची राजीनाम्यातून उद्वीग्नता - आशिष देशमुख

बाळासाहेब थोरात यांची राजीनाम्यातून उद्वीग्नता - आशिष देशमुख

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा घेऊ नये, घायचाच असेल तर, तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

काँग्रेसमधील वाद संपेल ही अपेक्षा

हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असला तरी, त्यांनी अनेक वेळा मंत्रिमंडळात काम केलं आहे. आम्ही अपेक्षा अशी करतोय की वाद संपेल, या वादाचा फायदा विरोधकांना होता कामा नये, अशी प्रतिक्रिया सचिन अहीर यांनी दिली.

नव्या पिढीला संधी मिळावी अशी बाळासाहेबांची इच्छा, सूत्रांची माहिती

२ तारखेलाच पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना वरिष्ठांना कळविल्यानंतर वरिष्ठांकडून बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे, अशी इच्छा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती

थोरातांचा राजीनामा की पत्र अजून माहित नाही - सुशीलकुमार शिंदे

बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आहे की पत्र आहे हे अजून माहिती नाहीये. त्यांच्याशी कोणाशी ही बोलणं झालेलं नाहीये. मी काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत पुण्यात होतो. त्यांनाही हे माहिती नाहीये. हे सर्व वाद टेम्पररी असतात, आता सगळं ठीक होईल, काळजी करण्याचं कारण नाही, असं म्हणत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील अंतर्गत धुसफुशीवर बोलणं टाळलं.

बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे- सत्यजित तांबे

बाळासाहेब थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे? यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं.

साहेबांची माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही - जयश्री थोरात

साहेबांची माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही. साहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं, मात्र यावर मी काही बोलू शकत नाही, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं.

बाळासाहेत थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार- अशोक चव्हाण

मला बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आताच कळालं असून ही दुर्दैवी बाब असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वकाही करणार असल्याचे ते म्हणाले. थोरात पक्ष सोडून जाणार नाही असंही चव्हाण म्हणाले.

बाळासाहेब थोरातांवर अन्याय झाल्याशिवाय ते असं पाऊल उचलणार नाहीत

बाळासाहेब थोरात हे संयमी आणि शांत वृत्तीचे नेतृत्व आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्याशिवाय ते असे पाऊल उचलणार नाहीत, असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना. काँग्रेस अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवले. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याची माहिती

बाळासाहेब थोरातांना कुठलीही ऑफर देणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. बाळासाहेब थोरात एवढे लहान नेते नाहीत त्यांना ऑफर दिली तर येतील. कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांना दरवाजे उघडे असतील आणि त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

राज्याच्या राजकारणातून सध्या मोठी बातमी समोर येत असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू होते.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता वाढदिवसा दिनीच बाळासाहेब थोरातांनी मोठा धक्का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT