Maharashtra Assembly Session 2023 saam tv
महाराष्ट्र

Pavsali Adhiveshan 2023 Live: 'शासन आपल्या दारी' जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च, राज्य सरकारची कबुली

Chandrakant Jagtap

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी देखील आज विधान परिषदेत उपस्थितीत लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काल देशप्रेमीची बैठक झाली. पक्ष येत असतात जात असतात. पण जो पायंडा पडत आहे तो घातक आहे, हुकुमशाही विरोधात ही एकजूट आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांची त्यांच्या दालनात जाऊन भेट देखील घेतली. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यासाठी चांगल काम करावं यासाठी अजित पवार यांची भेट घेतली. नागरिकांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका ही भावना त्यांना सांगितली. त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्याकडून जनतेला मदत मिळेल. तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray

शासन आपल्या दारी' जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च, राज्य सरकारची कबुली

शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी 52 कोटी 90 लाख 80 हजार इतक्या खर्साच सरकारने मान्यता दिल्याची माहिती सरकारने विधानपरिषदेत दिली आहे. तत्पूर्वी विरोधकांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप केला होता.

निष्पाप व्यक्तीवर पोलिसांनी गोळी चालवली नाही - फडणवीस

फडणवीस म्हणाले, जेव्हा हे अनियंत्रित होतंय आणि मोठा विषय होतोय असं लक्षात आलं तेव्हा त्यावेळी रबर बुलेट चालवल्या आहेत. माझ्याकडेही सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो त्या जमावात होता, तो जमाव तिथे दंगा घालताना दिसत आहे. तो कुठल्याही गेटच्या आत नव्हता. त्या जमावाला पांगवण्यासाठी या रबर बुलेट चालवल्या, त्यात त्याला ती रबर बुलेट लागली. त्यामुळे कुठल्यातरी निष्पाप व्यक्तीला पोलिसांनी मारलं हे खरं नाही. मुळात दंगल करणाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर यात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. सीसीटीव्ही फुटेज चेक करूनच जे लोक दंगल करताना दिसत आहेत, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणी निर्दोष आणि निष्पाप आहे आणि त्याच्यावर केस लावली आहे असं नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अफवा पसरल्याने जमाव जमा झाला - फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, अबु आजमी यांनी मांडली ती वस्तुस्थिती नाही. जिथे ही घटना घडली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक लोकं राहतात. तिथे राम मंदीर आहे. त्याठिकाणी आधी तिथे तीन लोकं गेली, ते परतत असताना बाचाबाची झाली. त्यानंतर आणखी सहा लोकं गेली. त्यांना सांगण्यात आलं की मंदिर बंद आहे. त्यानतंर ते सहा लोक परतत असताना तिथे अफवा अशी पसरवण्यात आली की, मंदिरात 200-250 लोकं लपून बसली आहेत आणि ते आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला.

त्यावेळी मंदिरात कोणीच नव्हतं - फडणवीस

फडणवीस यांनी सांगितलं की, " त्यावेळी मंदिरात कोणी नव्हतं. पोलिस हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता येथे कोणी नाहीये, कोणीही लपून बसलेलं नाही. कुठलाही हल्ला होणार नाही. पण या अफवेतून परत तिथे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. तिथे विटांचे ढिग होते. विटा घेण्यात आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडून पोलिसांवर दबाव होता. त्यात पोलिसच जास्त जखमी झालेत, पोलिसांनाच मार खावा लागला. पोलिसांवरच विटा आल्या."

ज्याला गोळी ती व्यक्ती घराच्या गेटमध्ये होती - अबु आझमी

आझमी म्हणाले, "गुडघ्यावर गोळी झाडली असती तर डिव्हायडरला लागली असती. कारण तिथे उंच डिव्हायडर आहे. त्याला वर गोळी लागली. तेव्हा लाईट देखील नव्हती आणि अधिकाऱ्याने सांगितले की मी त्यातील 25 लोकांना ओळखले आणि त्यात गोळी लागलेला तरुण देखील होता. तो तर त्याच्या घराच्या कम्पाउंडमध्ये होता. मी क्लिप देखील आणली आहे. अधिकाऱ्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. ती व्यक्ती त्याचं घर चालवणारी एकमेव होती. त्यानतंर हे जे काही रोज होतंय, त्यासाठी हेट स्पीचवर बंदी घातली गेली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने देखील हेच म्हटलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्याने गोळी झाडली आणि ज्या व्यक्तीने खोटी एफआयआर घेतली, त्याच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील अबु आझमी यांनी यावेळी केली."

चुकीचा एफआयआर दाखल करण्यात आला - अबु आझमी

यानंतर अबू आझमी यांनी पुन्हा संभाजीनगर येथील दंगलीबाबत बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, "त्या रात्री पुन्हा 30 लोक आले आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला. त्याने लिहिले की 250-250 लोक दोन्ही बाजूने होती. मला मान्य आहे की प्रतिक्रियेत ज्या लोकांनी वाहनं जाळली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु 250-250 लोक दोन्हीकडे असताना अटक फक्त एकीकडच्याच लोकांना झाली. त्यावेळी अधिकाऱ्याने सांगितले की गुडघ्याच्या दिशने गोळी झाडली, पण ते खोटं आहे."

वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे, चुकीचे अर्थ काढू नका - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, माझी अबू आझमी यांना माझी विनंती आहे की या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल आपल्या आई समोर डोकं टेकवू नका. हे धर्म गीत नाही. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे, चुकीचे अर्थ काढू नका. आपण संविधान मानतो म्हणून आपण इथे आलो. सभागृहाला देखील सुरुवात होत नाही. या सभागृहातही आपण वंदे मातरम् आणि जन गण मनं म्हणतो. त्यामुळे मला वाटतं ही भावना योग्य नाही, बाकी आपले मुद्दे आपण इथे मांडा.

सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

अबू आझमी बोलत असतानाच भाजप आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विधानसभेत वेलमध्ये येऊन आमदारांनी घोणाबाजी केली. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. यानतंर सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले.

आम्ही आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही - अबु आझमी

पुढे बोलताना अबु आझमी म्हणाले, "'जब गुलिस्तां को जरुरत पडी, सबसे पहले गर्दन हमारी कटी, अब ये हमसे कहते थे अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नही'. 29 मार्चच्या सायंकाळी 5 वाजता औरंगाबादमध्ये तीन लोक राममंदीराजवल मोटरसायकलवरून आले. त्यांनी 'इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम कहना होगा' अशा घोषमा दिल्या. अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं, पण रात्री पुन्हा 15 ते 20 लोक आले आणि घोषणाबाजी सुरू केली. यानंतर दोन्हीकडचे लोक जमा झाले"

सभागृहात नेमकं काय घडलं?

अबू आझमी म्हाणाले "आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधत आहे. एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर संपूर्ण देशभरात मुसलमानांविरुद्ध कारवाई सुरू झाली. माझ्या मराहाष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाज आक्रोश रॅली निघू लागल्या. त्या रॅलिंमध्य मुसलमानांना एवढं अपमानित केलं की मुसलमानांपेक्षा मोठी देशद्रोही दुसरा कुणीच नाही".

देवेंद्र फडणवीसांची अबू आझमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

माझी अबू आझमी यांना विनंती आहे या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल आपल्या आईला तुम्ही मान देऊ नका. हे धर्म गीत नाही. आपण संविधान मानतो म्हणून आपण इथे आलो आहोत. चुकीचे अर्थ काढू नका.

तलाठी भरतीची मुदत पुन्हा वाढणार, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

अधिवेशनादरम्यान आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीची मुदत वाढवण्याची विनंती सरकारकडे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापू्र्वी तलाठी भरतीची मुदत एकदा वाढवली आहे. आता पुन्हा एकदा मुदत वाढविण्याची विनंती महसुल मंत्री यांना केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्या सरकारचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

ज्येष्ठ विधीज्ञांची टास्क फोर्स स्थापन करणार

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनात दिले छापिल उत्तर

विधान परिषद कामकाजाततारांकित प्रश्नोत्तर यादीत दिली माहिती

न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय.

न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ञांची एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा घेतला निर्णय.

क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

'क्युरेटिव्ह' याचिका फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग नेमले जाईल

कृषी मंत्री यांचे उत्तर समाधानकारक नव्हते - सुनील प्रभू

विधानसभेत तारांकित प्रश्न 2 वर खताच्या किमतीबाबत उत्तर मागितले. खताच्या भाववाढीबाबत प्रश्न विचारला होता. परंतु कृषी मंत्री यांचे उत्तर समाधानकारक नव्हते. शेतकऱ्यांची फसवणूक केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. सरकारला शेतकऱ्याची जराही काळजी नाही. हे सरकार निष्क्रिय आहे, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला असे सुनील प्रभू म्हणाले.

बियाण्यांबाबत सरकारला उत्तर देता आले नाही - बाळासाहेब थोरात

बियाणेबाबत सरकारला प्रश्न विचारला त्यांना उत्तर देता आले नाही असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ते म्हणाले, बोगस बियाणे असल्याचे नंतर कळते आहे, खतांच्या किमती आहेत त्यावर सुद्धा उत्तर आलं नाही. खताच्या किमती स्थिर नाहीत. नफेखोरी करण्याचं प्रयत्न झाला आहे. कर्जमाफीसुद्धा राज्यात झाली नाही. सरकार म्हणून शेतकऱ्यांवर आणि खरिफ हंगामावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. उत्तरही दिले नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला आहे, असे थोरात म्हणाले.

बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस बियाणांविषयी बोलताना मोठी घोषणा केली आहे. बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, बोगस बियाणांबाबत निर्णय केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याठी कारवाई व्हावी यासाठी बिटी कॉटनप्रमाणे कायदा करणार आहोत. त्यासाठी समिती नेमली आहे. याच अधिवेशनात बोगस बियाण बाबत कायदा आणला जाईल, असेही मुंडे म्हणाले.

खताच्या किमतीवरून विधानसभेत खडाजंगी

विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवरती 20 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर मग या ठिकाणी कमी का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. अधिकचा दर देऊन खत खरेदी करावा लागत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यावर उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खतांच्या दरात घट झालेली आहे अशी माहिती दिली. बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार असेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

उद्या अजित पवार यांच्या वतीने डिनर डिप्लोमसी

उद्या अजित पवार यांच्या वतीने डिनर डिप्लोमसी. सत्ताधारी गटातील सर्व आमदारांना जेवणासाठी निमंत्रण. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी गटातील सर्व आमदार एकत्र येणार. हॉटेल ओबरॉय येथे उद्या संध्याकाळी डिनरच आयोजन.

विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

"महिलाविरोधी कंलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो विरोधकांकडुन घोषणा"

"पाच हजार महिला गेल्या कुठे गेल्या कुठे? "

"महिला झाल्या बेपत्ता - सरकारला नाही पत्ता"

"खोक्यावर वर खोके, एकदम ओके"

"बोके झाले ओके ओके"

उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता विधान भावनात येणार

उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता वाजता विधान भावनात येणार आहेत. विधान परिषद सभागृहात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होणार?

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. बी बीयाणे आणि खते यांच्या किमतीत वाढ यासह शेतकऱ्यांशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील महीला मुलींवर आत्याचाराच्या प्रकरणात वाढ, औरंगाबाद दंगल प्रकरण, शिवशाही बसला अचानक लागणाऱ्या आगीच्या घटना आणि सातारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून आज सभागृहात आज गोंधळ होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT