chhatrapati sambhaji nagar  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबले अन् तिथेच घात झाला; वीज पडून ४ जणांचा मृत्यू , छत्रपती संभाजीनगरात हळहळ

chhatrapati sambhaji nagar shocking : छत्रपती संभाजीनगरात वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात शनिवारी रोजी दुपारच्या सुमारास विजेचे तांडव होऊन वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. या सहा घटनांमध्ये एक महिला, तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. वीज कोसळल्यामुळे दोन घटनांमध्ये चार जनावरे ठार झाली आहेत.

अस्मानी संकटाने दुपारच्या सुमारास तालुक्यात हैदोस केला. मोढा बुद्रूक येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असताना रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सारोळा येथे वीज कोसळून दोन सख्खे भाऊ रोहित राजू काकडे आणि यश राजू काकडे ठार झाले.

आईवडिलांना दोनच मुले असल्यामुळे दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. दोघे भाऊ पेरणीसाठी शेतात गेले होते. पाऊस सुरु झाल्यानंतर ते आडोशासाठी झाडाखाली उभे होते. पिंपळदरी येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पेरणीसाठी शेतात गेलेले दोघे भाऊ पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील पत्र्याच्या शेडलगत उभे होते. त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

या दुर्घटनेत शिवराज सतीश गव्हाणे यांचा मृत्यू झाला तर जीवन सतीश गव्हाणे (वय.20) हा जखमी झाला. त्याला तातडीने सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर खातखेडा येथे शेतात काम करीत असलेल्या २० वर्षीय विशाल ज्ञानेश्वर शिंदे याच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन्वी शिवारातील शेतकरी नारायण सांडू बांबर्डे यांच्या गट क्रमांक 139 मधील शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली. दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्या गट क्रमांक 296 मधील शेतात वीज कोसळून तीन वासरे ठार झाली. या दुर्घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : या गोष्टींवर पाय लावल्याने आयुष्यभर भोगावी लागतील पापं

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

SCROLL FOR NEXT