नगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे परिसरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात आरोग्य वर्तुळ चक्रावून गेले आहे. डॉ. शेळके यांचा वरिष्ठांकडून छळ होत असल्याचे बोलले जात आहे.
आत्महत्येचा प्रकार केंद्रातच घडल्याने त्यांचे सहकारी हबकून गेले आहेत. डॉ. शेळके हे सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले होते. त्यानंतर त्यांना वरिष्ठांनी तिसगाव येथे बोलावून घेतले. तेथील मिटिंगनंतर परत उपकेंद्रात परतले. त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकाला जाणवले. त्या आरोग्य सेवकाने डॉ. शेळके यांच्यासोबत संभाषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. शेळके हे मानसिक तणावाखालीच होते. (Life ended by a health officer at Karanji)
"सर जास्त टेंशन घेऊ नका, नोकरीत असे चालूच असते," अशा शब्दांत कर्मचाऱ्याने समजावण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्यांच्या मनाची घालमेल कमी झाली नाही. त्यानंतर ते पेन व कागद घेऊन आले व टॅब जमा करा, मी राजीरामा लिहिणार आहे, असे सांगितले. त्यानंतर ते थेट रूममध्ये गेले. दरवाजा आतून लावून घेतला.
साधारण दोन लसीकरण केल्यानंतर नर्सने जेवणासाठी डॉक्टरांना आवाज दिला. आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला. तरीही आतून काहीच जवाब आला नाही. या प्रकारामुळे कर्मचारी घाबरले. त्यांनी लगबगीने फोन लावला. फोनची केवळ रिंग वाजत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. सर्व नर्स सेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. खिडकी उघडली असता त्यांना डॉक्टरांनी पंख्याच्या हुकाला दोरी लावून गळफास घेतल्याचे दिसल्याचे दृष्टीस पडले, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सुसाईड नोट सापडली
त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, मी आत्महत्या करीत असून, त्यास तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे हे व प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण तसेच वेळत पगार नाही. एकीकडे असे असताना वरून पगार कपातीची धमकी दिली जात होती. या सर्व जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
डॉ. शेळके यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश खोमणे व पोलीस निरीक्षक कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करीत आहेत. (Life ended by a health officer at Karanji)
Edited By - Ashok Nimbalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.