Sarjeravdada Naik Shirala Co-operative Bank
Sarjeravdada Naik Shirala Co-operative Bank Saam Tv
महाराष्ट्र

आरबीआयची मोठी कारवाई: सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) महाराष्ट्रातील सांगलीत सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा (Sarjeraodada Naik Shirala Co Operative Bank Shirala) परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याने आरबीआयने (RBI) हे पाऊल उचले आहे. आरबीआयने आपल्या परिपत्रकात सांगितले आहे की, परवाना रद्द झाल्यावर सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडचे बँकिंग व्यवहार बुधवारी कामकाजाचा दिवस समाप्त झाल्याबरोबरच बंद करण्यात आले आहे. (License Sarjeravdada Naik Shirala Co operative Bank canceled)

हे देखील पहा-

महाराष्ट्रात (Maharashtra) सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही बँक बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कर्जदारासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे, असे पत्रकात सांगितले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार की लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसीकडून (DICGC) ५ लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असणार आहे.

आरबीआयने ३ बँकांना देखील दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या अगोदर ३ सहकारी बँकांना दंडही ठोठवला आहे. रिझर्व्ह बँकेने छत्तीसगडच्या रायपूर मधील नागरिक सहकारी बँक लिमिटेडसह ३ सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. या बँकांना नियामक अनुपालनातील त्रुटींकरिता दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

Today's Marathi News Live : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

SCROLL FOR NEXT