रस्त्याची तक्रार केल्याने संरपंचाकडून जीवे मारण्याची धमकी; गावकऱ्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
रस्त्याची तक्रार केल्याने संरपंचाकडून जीवे मारण्याची धमकी; गावकऱ्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिनू गावित
महाराष्ट्र

रस्त्याची तक्रार केल्याने संरपंचाकडून जीवे मारण्याची धमकी; गावकऱ्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या झामणझर ग्रामपंचायत अंतर्गत बेडकीपाडा ते दादरीफळी दरम्यान साडेचार किलोमीटर रस्त्याचे काम शासनाच्या परिपत्रकानुसार न करता नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम विभाग (Nandurbar ZP Construction Department) अधिकारी, ठेकेदार यांच्यावतीने निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत सुधारणा व्हावी व चांगले काम करावे अशी मागणी केली होती.

मात्र नागरिकांनी ही मागणी केली म्हणून सरपंच व जिल्हा परिषद सदस्य राया मावची यांनी सदर नागरिकांना अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत नागरिकांनी नवापूर पोलीस ठाण्यात (Navapur Police Station) तक्रार दाखल केली आहे. परंतु राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

सदर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रारीनंतर अर्धवट काम करून ठेकेदार पसार झाला आहे. यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही (Construction Department Officers) दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या अंदाजपत्रकानुसार कोणतेही काम झालेले नसतानाही अधिकारी कारवाई करीत नाही. सदर गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील फरशी पूल ही धोकादायक असल्याने अपघातांमुळे नागरिकांचा जीवाला धोका आहे तरीदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्य़ाचा नागरिकांचा आरोप आहे.

हे देखील पहा -

तसंच, बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर स्थानिक नेते कारवाई करून सामान्य नागरिकांना न्याय देतील का? भ्रष्ट ठेकेदार अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाभरात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्या नावाखाली ग्रामसडक योजनेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची व जनतेची आर्थिक फसवणूक करून नुकसान करणाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करून सामान्य नागरिकांना न्याय देतील का? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बीडमध्ये उष्णतेचा पारा वाढला; तापमान 42 अंशावर

Marathi Actress: ब्लॅक साडी, बोल्ड सौंदर्य.. मराठी सुंदरीच्या फोटोंनी लावलं वेड!

Job Tips: पहिल्या नोकरीची घ्या खबरदारी; 'या' चुका केल्यास होईल नुकसान

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

SCROLL FOR NEXT