Republic Day : प्रजासत्ताक दिनादिवशीच, ST कर्मचाऱ्यांनी केले भिक मांगो आंदोलन

शहरातील मुख्य चौकात जाऊन राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत, ST या कर्मचाऱ्यांनी भिक मागितली व महाविकास आघाडी सरकारचा (MVA Goverment) जाहीर निषेध व्यक्त केला.
Republic Day : प्रजासत्ताक दिनादिवशीच, ST कर्मचाऱ्यांनी केले भिक मांगो आंदोलन
Republic Day : प्रजासत्ताक दिनादिवशीच, ST कर्मचाऱ्यांनी केले भिक मांगो आंदोलनसंजय जाधव

बुलडाणा : मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी बेमुदत बंद आंदोलन केल आहे. शरद पवारांनी मध्यस्थी करुनही कर्मचारी आंदोलनावरती ठाम आहेत दरम्यान या तीन महिन्याच्या काळात 80 एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) मृत्यू झाला आहे. त्यांचत कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आणि त्यामुळेच आज प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवरती बुलडाणा ST आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बुलडाणा शहरात भिक मांगो आंदोलन केलं आहे.

Republic Day : प्रजासत्ताक दिनादिवशीच, ST कर्मचाऱ्यांनी केले भिक मांगो आंदोलन
'एखाद्या विद्यार्थ्यांने स्वप्नील लोणकरसारखे पाऊल उचलले, तर त्याला राज्य सरकार जबाबदार'

शहरातील मुख्य चौकात जाऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करीत या कर्मचाऱ्यांनी भिक मागितली व महाविकास आघाडी सरकारचा (MVA Goverment) जाहीर निषेध व्यक्त केला. तसंच जोपर्यंत शासनात एसटीचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा य़ा संपकरी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com