'एखाद्या विद्यार्थ्यांने स्वप्नील लोणकरसारखे पाऊल उचलले, तर त्याला राज्य सरकार जबाबदार'

'मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला आहे.'
'एखाद्या विद्यार्थ्यांने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर, त्याला राज्य सरकार जबाबदार'
'एखाद्या विद्यार्थ्यांने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर, त्याला राज्य सरकार जबाबदार'Saam TV
Published On

सांगली : मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला आहे. आणि म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधत असल्याचं वक्तव्य भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं आहे.

ते म्हणाले, 'संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच मा. उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. मात्र उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा.'

'एखाद्या विद्यार्थ्यांने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर, त्याला राज्य सरकार जबाबदार'
'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'

मला सरकारला हे सांगायचं की, MPSC ने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे हे, मा. उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर याची सर्वस्वी चे जबाबदारी राज्य सरकारची असेल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com