पारावरची शाळा विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

'पारावरची शाळा' : पिंपळाच्या झाडाखाली आयुष्याचे धडे

सामाजिक अंतर राखत केतूर गावात पारावर भरणाऱ्या शाळेचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये

सोलापूर : आजपर्यंत आपण ग्रामीण भागात ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या मंडळींना पारावर बसून गप्पागोष्टी करताना पाहिलं असेल. पारावरची हि संमेलनं या जुन्या-जाणत्या मंडळींनी टिकवली आहेत. मात्र जशी जशी हि वयोवृद्ध मंडळी पारावर दिसेनाशी झाली तसे हे गावाचा वारसा सांगणारे पार ओसाड पडू लागले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील केतूर गावच्या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक विकास काळे यांनी याच पारावरच्या हितगुजीला आधुनिक रूप देण्याचा अनोखा प्रयत्न कोरोना संकटाच्या या गडद छायेत केला आहे. Lessons of life under the Pimpal ( Sacred fig) tree

हे देखील पहा -

पिंपळाच्या गडद सावलीखाली बच्चेकंपनीसाठी पारावरची शाळा भरवण्याचा निर्णय काळे गुरुजींनी घेतला आहे. या शिक्षणाच्या अनोख्या उपक्रमाला गेल्या दीड वर्षांपासून घरीच असणाऱ्या लहानग्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केतूर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील पिंपळाच्या झाडाखाली ही शाळा भरू लागली आहे. चार भिंतीच्या आत बसून शिकण्यापेक्षा पिंपळाच्या झाडाखाली बसून मिळणारे जीवनाचे धडे विद्यार्थीही मन लावून गिरवत आहेत.

कोरोना महामारीच्या संकटामुळे सगळीकडेच शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे तर काही ठिकाणी मोबाईलला येणाऱ्या नेटवर्कच्या अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आवड, ओढ वरचेवर कमी होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे लहानग्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी ही वाढल्या आहेत. या सर्वांचा शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी कमी झाली असली तरीही अजून पण हे संकट टळलं नाही. तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून, ही लाट विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक आणि घातक असल्याच सांगितलं जात आहे. मात्र या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारावरची शाळा हा उपयुक्त पर्याय मानला जात आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून, मास्क, सोशल डिस्टन्स राखून आणि विशेष म्हणजे मर्यादित विद्यार्थी संख्या ठेऊन ही शाळा भरली जात आहे. त्यामुळे पालक देखील निर्धास्त झाले आहेत. सामाजिक अंतर राखत केतूर गावात पारावर भरणाऱ्या शाळेचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT