चविष्ट आणि गुणकारी रानभाज्यांच्या सिझनला सुरवात ; मुंबई व पुणे शहरात मोठी मागणी

अनेक पर्यटक पर्यटनासाठी मावळला पसंती देतात. येथील निसर्गाच्या कुशीत अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. बहुतांशी रानभाज्या देखील इथे आढळून येतात.
चविष्ट आणि गुणकारी रानभाज्यांच्या सिझनला सुरवात ; मुंबई व पुणे शहरात मोठी मागणी
चविष्ट आणि गुणकारी रानभाज्यांच्या सिझनला सुरवात ; मुंबई व पुणे शहरात मोठी मागणीदिलीप कांबळे
Published On

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्याला निसर्गाच वरदान मिळालं आहे. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनासाठी मावळला पसंती देतात. येथील निसर्गाच्या कुशीत अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. बहुतांशी रानभाज्या देखील इथे आढळून येतात. पेरणी न करता ज्या नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व आहारात उपयुक्त असणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या भाज्या मुख्यत्वेकरून जंगलात, शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या भाज्या आरोग्यदायी, औषधी गुणधर्मयुक्त, चविष्ट आणि गुणकारी असतात. Season of tasty and wholesome legumes; Great demand in Mumbai and Pune

हे देखील पहा -

पाऊस सुरु झाला की रानभाज्यांची वाढ सुरु होते. या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा हा रानमेवा पुणे आणि मुंबई शहरवासीयांना भलताच आवडू लागलाय. हे त्याच्या वाढत्या मागण्यावरून समजून येत आहे. या भाज्यांना कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही हेच काय कोणतीही लागवड देखील करावी लागत नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजेच रानभाज्या.

मावळ हा निसर्ग सौंदर्याने निसर्ग संपत्तीने व वनराईने भरलेला तालुका आहे. मावळ मध्ये भरपूर पाऊस पडतो आणि पावसाला सुरुवात झाली किंवा पावसाची रिपरिप सुरू झाली की डोंगरातील झाडे- झाडेझुडपे हिरवीगार होऊन बहरू लागतात. त्यात रानभाज्यांचीही उगवण्यास सुरवात होते. ग्रामीण भागातील महिला आवडीने रानभाज्या तोडण्यास डोंगरात फिरू लागतात. तसेच कातकरी व आदिवासी महिला रानभाज्या तोडून शहरी भागात विक्री करतात. यात प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला कुळू, चायत, अळूची पाने, त्यानंतर काठेमाठ, करटोली,चिचारडी, चायताचा मोहोर, यांचा या भाज्यांत समावेश असतो.

चविष्ट आणि गुणकारी रानभाज्यांच्या सिझनला सुरवात ; मुंबई व पुणे शहरात मोठी मागणी
केळी उत्पादकांची खरेदीदार, मध्यस्थांकडून लूट; स्वाभिमानीचे हेमंत पाटील यांना निवेदन

सध्या कुळू, चायत, अळूची पाने या रानभाज्या उगवल्या असून त्या कुसगाव बुद्रुक आणि लोणावळ्यात विकल्या जातात. रानभाज्या आरोग्यासाठी औषधी म्हणून उपयुक्त असतात. लोणावळ्यात राहणारे नागरिक तसेच पुणेकर व मुंबईकर पर्यटक हमखास या भाज्या विकत घेत असतात. मावळातील कातकरी महिलांना रानभाज्यांची विक्री झाल्यावर दोनशे ते तीनशे रुपये दिवसाला मिळतात. कातकरी कुटुंबाचा यातून उदरनिर्वाह होतो.

रानभाज्या आपल्या पूर्वजांच्या आहाराचा एक भाग होता. पण ह्याच रानभाज्या हळूहळू आपल्या जेवणातून गायब होत चालल्या आहेत. या रानभाज्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. आजच्या तरुण पिढीला रानभाज्या कोणकोणत्या असतात हे ही सांगता यायचे नाही. त्यामुळेच नवीन पिढीला या रानभाज्यांचे महत्व व ओळख करून घेण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com