कुष्ठरोग निमुर्लन विभाग कैलास चौधरी
महाराष्ट्र

उस्मानाबादेतील कुष्ठरोग आटोक्यात; मात्र, विकृती आलेल्यांचे वनवास!

कुष्ठरोग निमुर्लन विभागाला कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यास चांगले यश मिळाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद: कुष्ठरोग निमुर्लन विभागाला कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यास चांगले यश मिळाले आहे. यामुळे एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 22.03 टक्के वर गेलेले प्रमाण यावर्षी 13.25 टक्यांवर आले आहे. या आर्थिक वर्षात कुष्टरोगाचे (Leprosy) लक्षणं असलेल्या 231 रुग्णांना शोधण्यात आले त्यापैकी 172 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत तर काही रुग्ण आजार मुक्त झाले आहेत.

तसेच वेळीच उपचार मिळाल्याने विकृती येण्याचे प्रमाण शुन्यावर आले आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कुष्ठरुग्ण आढळत आहेत. मात्र, ही बाब एकादृष्टीने सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण कुष्ठरुग्णांवर उपचार सोपे आहेत. मात्र, त्यांचा शोध घेणेच अवघड आहे. ही जबाबदारी जिल्हा कुष्ठरोग निर्मुलन व्यवस्थितपणे पार पाडत आहे.

विकृती आलेल्या कुष्ठरोग्यांचा वनवास;

उस्मानाबाद (Osmanabad) शहराबाहेर स्वातंत्र्यपूर्व काळात मधुबन कुष्ठधाम उभा करण्यात आले होते कुष्ठरोगी असलेल्या रुग्णांसाठीची परिपूर्ण अशी वसाहत उभारण्यात आली होती. यामध्ये सहा क्वार्टर्स, किचन रूम, रुग्णालय, पिण्याच्या पाण्याची सोय आदी बाबींचा समावेश होता.

हे देखील पहा-

शहरालगतच सुमारे 25 एक्कर जागेवर हे कुष्ठधाम उभारण्यात आले. याठिकाणी आता पडक्या इमारती राहिल्या आहेत तसेच या ठिकाणी डॉक्टर किंवा इतर वैद्यकीय पदावरील एकही व्यक्ती या ठिकाणी फिरकत नाही येथे 5 विकृती आलेलं कुष्टरोगी आहेत. मात्र, यांची कुठल्याही प्रकारे काळजी घेतली जात नसून यांची औषध उपचार आणि दोन वेळेच्या जेवणासाठी देखील भ्रांत आहे. त्रयस्थ संस्थेकडून यांना ऐक वेळा जेवण मिळत असून यावरातीच संबधित रुग्णाची गुजराण सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT