संजय डाफ
नागपूर: माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे करणाऱ्या सुरज तातोडे यांच्याच सख्या भावाने खंडन केलं आहे. सुरज तातोडे यांनी ॲड. सतीश उके यांच्यामार्फत पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज सुरज याचे भाऊ निरज हे माध्यमांसमोर आले आणि सर्व आरोपांचे खंडन केले आहे. (Chandrashekhar Bawankule News Updates)
ते म्हणाले, "ब्रेन हॅमरेजनंतर सुरजची मानसिक स्थिती ढासळली आहे, त्याचा गैरफायदा घेत काही लोक बावनकुळे यांचे राजकारण खराब करण्याचे प्रयत्न करीत आहे. आमच्या आईवडिलांच्या निधनानंतर आम्ही रोजमजुरी करीत होतो, मात्र, साहेबांनी आम्हाला रोजगार दिला, घर दिले. सुरजला ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्याच्या उपचाराचा सर्व खर्च त्यांनीच केला. मात्र त्यानं दगा देत खोटे आरोप बावनकुळे यांच्यावर केले आहेत." असे निरज तातोडे यांनी सांगितलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!;
माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील वकील सतीश उके यांच्यावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहेत. सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेत बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा असल्याचा आरोप केला होता. तसंच बावनकुळे यांचे नातेवाईक असलेल्या सुरज तातोडे यांना सोबत आणून बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना असे आणि किती काळा पैसा घेतला याचा पाढा वाचून दाखविला होता. (Chandrashekhar Bawankule News)
मात्र, हे सर्व आरोप निराधार असून राजकीय षडयंत्र रचून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात आपण आपल्या संपत्तीची सर्व माहिती दिली आहे. मात्र, कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाइकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे काम सतीश उके यांनी केलं आहे. त्यामुळं यांच्यावर ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं बावनकुळे सांगितलंय.
बावनकुळेंवरील आरोप काय?
सुरज तातोडे यांनी आरोप केला होता की, चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सुरज हे त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील (Nagpur And Mumbai) बंगल्यावर काम करायचे. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सुरज तातोडे यांच्याकडे द्यायचे. दोन वर्षात अंदाजे 100 कोटी काळा पैसा बावनकुळे यांनी ठेवायला दिले, असा दावा तातोडे यांनी केला. एसजी इन्फ्रा, KKC, सरस्वती कन्ट्रक्शन या कंपन्याकडून बावनकुळे यांनी पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केला होता.
हे देखील पहा-
तसेच, काळ्या पैशाच्या हिशोबात घोटाळा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी सुरज तातोडे यांच्यावर केला होता. 30 लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांच्या नावावर असलेले नागपुरातील 5 फ्लॅट, 4 कार आणि एका कंपनीतील शेअर्स बावनकुळे यांनी जबरदस्तीने आपल्या नावावर केल्याचा आरोपही तातोडे यांनी केला. सततच्या धमक्या आणी टेन्शन मुळं तातोडे यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यातून ते बचावले, मात्र नैराश्याने ते खचले आणि शेवटी ऍड. उके यांच्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं होत.
ऍड. उके यांनी बावनकुळे हे आज पाच हजार कोटी रुपयांचे मालक आहे. ज्या प्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वर आरोप झाले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन खटला चालविला जातोय त्याच पद्धतीने बावनकुळे यांच्या विरोधात साक्षीदार आरोप करतोय, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या चौकशी केली जावी, अशी मागणी ऍड. उके यांनी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.