महाराष्ट्र

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Leopard Terror in Shirur : बिबट्यानं हल्ल्यानं शिरुरमध्ये एका 13 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला...मात्र या घटनेनंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. त्यात वनविभागही अॅक्शनमोडवर आलयं. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग कसा प्रयत्न करतेय? आणि गावकऱ्यांनी काय मागणी केली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू

  • 400 नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत.

  • गेल्या 15 दिवसात याच परिसरातील तीन जणांचा बिबट्यानं बळी घेतलाय.

हा आक्रोश आहे. पोटचं लेकरू गमावलेल्या एका बापाचा. बिबट्याचं हल्ल्यात पिंपरखेडमध्ये 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला..आणि जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मुलाचा अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका वडीलांनी घेतली.

गेल्या 15 दिवसात याच परिसरातील तीन जणांचा बिबट्यानं बळी घेतलाय. त्यामुळे गावकऱ्यांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करत वनविभागाच्या गाडीला आणि कार्यालयाला आग लावली. इतकचं काय तर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून रास्तारोको करत आंदोलन केलं. बैठकीचे केवळ आश्वासन नको, तर लेखी ठोस आश्वासन द्या.बिबट्याला गोळ्या घाला, अशी मागणी करत संतप्त आंदोलकांनी आमदार शरद सोनावणेंनाही घेराव घेतला.

शिरूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात बिबट्याची किती दहशत आहे. पाहूयात. जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झालाय. 400 नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. तर 14 हजार पेक्षा अधिक पाळीव जनावारांचा बिबट्यानं बळी घेतल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीय. तसचं पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या 1200 च्या पुढे पोहचलीय.

दरम्यान जनतेचा संयम सुटल्यानंतर वाढत्या दबावानंतर वनविभाग अॅक्शनमोडवर आलायं. चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला नरभक्षक बिबट्या म्हणून घोषित करण्यात आलयं. तसेचं त्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेशही वन विभागाने दिलेत. यानिमत्तानं पुन्हा एकदा बिबट्यांचा नसबंदीचा, त्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय. खासदार अमोल कोल्हेंनी याविषयी ठोस भूमिका घेण्याची मागणी केली.

महिन्याभरापूर्वी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. मात्र तरीही जुन्नर परिक्षेत्रातील बिबट्यांचा अद्याप बंदोबस्त करण्यात आलेला नाही. एखाद्याचा मृत्यू झाला की वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणेला जाग येते. वेगवेगळी आश्वासनं देऊन नागरिकांचा रोष थांबवण्याचा प्रयत्न होतो. मात्र ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात जाणारे हे बळी. प्रशासनाच्या नाकार्तेपणामुळे झालेले खून आहेत.अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या बिबट- मानव संघर्षामुळे आणखी किती जीव धोक्यात येणार? एका चिमुकल्याच्या मृत्यूनंतर तरी बिबट्यांचा बंदोबस्त होणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा माज काही तासांतच उतरला; कान पकडून मागितली माफी

Mirchi Vada: नाश्त्याला वडापाव कशाला? घरगुती अन् राजस्थान स्टाईल कुरकुरीत मिरची वडा ठरेल बेस्ट ऑप्शन

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Karnataka Politics : सत्तासंघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? कर्नाटकात 'डीके बॉस'!

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

SCROLL FOR NEXT