Women in Shirur wear nail-studded collars while working in fields to protect themselves from leopard attacks. Saam Tv
महाराष्ट्र

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Leopard Terror In Rural Maharashtra Villages: मानवी वस्तीवर होणारे बिबट्यांचे हल्ले रोखण्यात प्रशासन अक्षरशः अपयशी ठरलंय... तर दुसरीकडे बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या महिलांनी मात्र अनोखी शक्कल लढवलीय...स्वसंरक्षणासाठी महिलांनी लढवलेली ही शक्कल नेमकी काय आहे?

Girish Nikam

पुणे जिल्हाच्या उत्तर भाग बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय. जुन्नर वनपरीक्षेत्रात बिबटे अक्षरशा धूमाकूळ घालतायेत. बिबट्याची दिसणारी ही दृश्य कुठल्या जंगलातली नाही तर जुन्नर,आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यातल्या गाव,शेतशिवारातील आहेत. आता या बिबट्याच्या दहशतीने शेतात काम करणं सोडाच पण घराबाहेर पडणंही जिकरीचं झालंय.

प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता इथल्या नागरिकांनी सुरक्षेसाठी स्वत:चं उपाय शोधलाय... बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो. त्यामुळे शेतकरी आणि महिलांनी आपल्या गळ्यात चक्क टोकदार खिळे असलेला पट्टा घातलाय...

गेल्या 15 दिवसांत बिबट्याने तीन जणांचा बळी घेतलाय. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे वनविभागाने जनजागृतीसाठी व्हिडीओही जारी केला आहे. मात्र त्यापुढे जाऊन महिलांनी संरक्षण बेल्ट गळ्यात घालायला सुरुवात केली आहे. वाडीवस्त्यावरील रहिवाशांसाठी वनविभागाने उपाय सुचवलेत.

या भागातील बिबट्यांची संख्या 1200 वर गेली असून आतापर्यंत बिबट्यानं 54 जणांचा बळी घेतलाय. तर 5 हजार नागरिकांवर हल्ले केले आहेत. आता अजून किती बळी जाण्याची वाट बघायची असा सवाल करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यावरुन खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.बिबट्यापासून जीव वाचण्यासाठी नागरिकानी आपल्या परीने उपाय शोधला. मात्र दहशतीत असलेल्या या ग्रामस्थांना वनविभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कधी दिलासा मिळणार ? यंत्रणा कायमचा उपाय कधी शोधणार ? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT