leopard near lata mangeshkar bunglaow 
महाराष्ट्र

लता मंगेशकर बंगल्यानजीक हाेता बिबट्या; पिंजरा लावण्याची मागणी

Siddharth Latkar

सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा panhala परिसराती लाेकप्रिय गायिका लता मंगेशकर lata mangeshkar यांचा बंगला आहे. या बंगल्यानजीक बिबट्याचा leopard near lata mangeshkar bunglaow वावर दिसून आला. या बिबट्यास तीन मित्रांनी शुक्रवारी पाहिले. त्यांनी काही सहका-यांना परिसरात बाेलाविल्यानंतर ग्रामस्थांची देखील ताेबा गर्दी झाली. दरम्यान हा बिबटा येथून गेला असला तरी त्याचा तातडीने बंदाेबस्त करावा अशी मागणी शेतक-यांसह ग्रामस्थांची आहे.

शुक्रवारी (ता.१३, ऑगस्ट) संध्याकाळी पन्हाळा किल्ल्याजवळ तीन मित्रांना एका खडकावर बिबट्या पहूडलेला दिसला. पन्हाळा किल्ल्याकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या भूस्खलनामुळे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यावर अथवा माळावर जाण्यासाठी निकमवाडीता मार्ग लाेक वापरतात. परंतु हा मार्ग वापरणे आता धोकादायक ठरू शकते असे ग्रामस्थ म्हणून लागलेत.

शुक्रवारी लता मंगेशकर बंगल्यानजकी खालच्या बाजूला एका बिबट्याने येथे फिरण्यासाठी आलेले उत्तम दळवींचे लक्ष वेधले. दळवी हे त्यांच्या मित्रांसह त्या मार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांना एका उंच कड्यावर बिबट्या दिसल्याने त्यांनी मित्राला फोन केला. ही माहिती परिसरातील रहिवांशाना समजली. ते देखील बिबट्या आल्याचे ऐकून माेठ्या संख्येने तेथे जमले.

एका ग्रामस्थाने लोकांना गर्दी करु नका अशी विनंती करीत बिबट्या त्याच्या योग्य ठिकाणी आहे आणि कोणीही घाबरू नये असे सांगितले. गावक-यांच्या म्हणण्यानूसार पन्हाळा किल्ल्याच्या आजूबाजूच्या जंगल परिसरात सुमारे सात -आठ बिबटे राहतात. शुक्रवारी आलेल्या बिबट्याने आजूबाजूची गर्दी पाहून जंगलात धूम ठाेकली.

या भागात गव्यांचे प्रमाण जास्त आहे. पन्हाळा परिसरात बिबट्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु निकमवाडीसह इंजाेळे येथील ग्रामस्थ, शेतकरी लता मंगेशकर बंगल्यानजीक सापळा लावून अथवा पिंजरा लावून बिबट्यास पकडले पाहिजे अशी मागणी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT