Junnar MLA enters the Maharashtra Assembly in a leopard costume to raise concern over the growing leopard menace. 
महाराष्ट्र

Leopard: आता बिबट्याची थेट विधानभवनात एंट्री? जुन्नरचे आमदार थेट बिबट्याच्या वेशात

MLA Sharad Sonawane Wearing Leopard Costume : बिबट्याने राज्यात प्रचंड धुमाकूळ घातलाय. जुन्नरमध्ये लोकं भीतीच्या छायेत जगत आहेत. मात्र बिबट्याची विधानभवनातही चर्चा रंगलीय. कारण जुन्नरच्या आमदाराने अनोख्या पद्धतीने बिबट्याच्या दहशतीकडे लक्ष वेधलंय. ते नेमकं कसं.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नरमध्ये वनविभागाने कोंबडी ठेऊन सापळा लावला होता

  • बिबट्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी

  • बिबट्यांच्या जन्मदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनोखा सल्ला दिलाय

शेत शिवारापासून ते शहरांपर्यंत धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याने आता नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनातच एण्ट्री केलीय. हा व्हिडीओ नीट पाहा. बिबट्याच्या वेशात दिसत असलेले हे आहेत शिंदेसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुरच नाही तर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

त्याकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी बिबट्याच्या वेशात एंट्री केली. एवढंच नाही तर शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात थेट विधानसभेत पोहोचले. मात्र तालिका अध्यक्षांनी शरद सोनवणेंना चांगलंच सुनावलंय. वनमंत्र्यांनी बिबट्यांना १ कोटीच्या बकऱ्यांची मेजवानी देण्याचा सल्ला आमदार सोनवणेंनी केवळ धुडकावूनच लावला नाही तर बिबट्यांच्या जन्मदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनोखा सल्ला दिलाय.

एका बाजूला वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावत आहे. मात्र सतत लावलेल्या सापळ्यामुळे बिबट्याही आता हुशार झालाय. आता बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नरमध्ये वनविभागाने कोंबडी ठेऊन सापळा लावला होता. मात्र बिबट्यानं पिंजऱ्यात न शिरताच बाहेरुन पंजा मारुन पिंजऱ्यातली कोंबडी ठार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी, रेस्क्यू सेंटर्सचा उपाय महत्वाचा मानला जातो. मात्र सरकार बिबट्यांवर वैज्ञानिक तोडगे काढण्याऐवजी त्यांना मेजवानी देण्याचा घाट घालतंय. मुळात बिबट्यांना आळा घालण्यासाठी उपायांची तातडीनं अंमलबजावणी करणार की केवळ चर्चांचं गुऱ्हाळ रंगणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT