Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

Maharashtra Leopard News : राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी सरकार आणि वनविभागाने नसबंदी, रेस्क्यू सेंटर, पिंजरे वाढवणे आणि नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.

रोहिदास गाडगे, Alisha Khedekar

राज्यात वाढत्या बिबट हल्ल्यांवर नियंत्रणासाठी सरकारची विशेष मोहीम सुरू

बिबट मादीची नसबंदी, रेस्क्यू सेंटर आणि पिंजरे वाढवण्याची तयारी पूर्ण

नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक

माणिकडोहमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञानासह नसबंदी सुविधा सज्ज

रोहिदास गाडगे, खेड

राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आता राज्य सरकार आणि वनविभाग पूर्णपणे सज्ज झालेत.बिबट आणि माणूस यांच्यातला संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदीपासून रेस्क्यू सेंटरपर्यंतच्या उपाययोजना राबवण्याची तयारी पूर्ण झालीय. मात्र, या मोहिमेत वनविभागापुढे मोठी आव्हानं उभी आहेत. राज्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बिबट-माणूस संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने व्यापक मोहीम हाती घेतलीय.

राज्य सरकारकडून बिबट मादीची नसबंदी, नरभक्षक बिबट्यांना जेरबंद किंवा ठार मारणे, आणि मानवी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करणे या तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन उत्तर पुणे जिल्ह्यात दोन नवीन बिबट रेस्क्यू सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,माणिकडोह निवारा केंद्रात नसबंदी शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर आणि विशेष यंत्रणा तयार ठेवण्यात येत आहे.

बिबट आणि माणुस यांच्यातला संघर्ष रोखण्यासाठी वनविभागापुढे आव्हाने असणार आहे

बिबट नसबंदी

  • बिबट मादीची नसबंदी करताना मोठी आव्हान असणार आहे कारण याकाळात बिबट मादीने पिल्लांना जन्म दिलेला आहे

  • नसबंदी करण्याअगोदर बिबट मादीला बेशुद्ध करणे महत्वाचे

  • नसबंदी च्या शस्त्रक्रियेला सुसज्ज यंत्रणा आणि डॉक्टरांची टिम आवश्यक

  • बिबट मादीची नसबंदी नंतर ती मादी पुन्हा सोडण्यात येणार असुन या मादीवर नसबंदीनंतर तीन वर्ष लक्ष ठेवावे लागणार.

बिबट निवारा केंद्र

  • वनविभाग जंगल परिसरात दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारणी करणार

  • बिबट रेस्क्यू साठी पिंज-यांची संख्या वाढविण्यात येणार

  • वनविभागाचे मनुष्यबळ वाढविणार

नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालणार...

  • बिबट्याने मनुष्यावर हल्ला किंवा ठार मारल्यानंतर या बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करणे किंवा पुन्हा केंद्राकडून ठार मारण्याची परवानगी मिळवणे

  • बिबट्याला ठार करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे बंधनकारक

  • बिबट्याला शेड्युल 1 मधुन शेड्युल 2 मध्ये टाकण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...नाहीतर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी

Sleep Facts: स्वप्नात ओरडलो तरी आवाज निघत नाही? असं का होतं?

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

SCROLL FOR NEXT