leopard attacked child near sangli saam tv
महाराष्ट्र

Bravery: दुरंदरेंच्या 'दुर्गा' अवतारामुळं बिबट्याने बालकास जागेवरच टाकून ठाेकली धूम

बालकास बिबट्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यातील तडवळे (tadvale) येथे ऊसतोड मजुराच्या गणेश श्रीराम कांबिलकर (वय ५ ) या मुलावर बिबट्याने (leopard attacked five year child in tadvale near sangli) हल्ला करून जख्मी केले आहे. मंगळवारी (ता.१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घडली. (sangli latest marathi news)

शिवाजी तुकाराम पाटील हे (sangli) तडवळे येथे त्यांच्या शेतात दिवसभर ऊसतोड केलेला ऊस (sugarcane) ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम सर्व ऊसतोड मजूर करत होते. यावेळी गणेश हा ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बसलेला होता. त्यावेळी गणेश याच्यावर बिबट्याने (leopard) अचानक झडप घातली. तसेच त्यास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

गणेशला घेऊन जात असताना दुर्गा दुरंदरे या ऊसतोड कर्मचारी महिलेने ते पाहिले. दुरंदरे यांनी आरडाओरडा केल्याने दरडीवरून जात असताना बिबट्याने गणेशला सोडून देत पळ काढला. गणेशला जखमी अवस्थेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यास सांगली येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT