जुन्नरमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

जुन्नरमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

बिबट्याने बालकास घराजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले.

रोहिदास गाडगे

जुन्नर - तालुक्यातील राजुरी येथील गव्हाळी मळयामधील एका तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील गव्हाळी मळ्यातील राहत असलेल्या अक्षय चासकर यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा वेद चासकर अंगणात खेळत असताना बिबट्याने अचानकपणे या बालकावर हल्ला केला. त्यानंतर या बिबट्याने बालकास घराजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले. मुलाच्या रडण्याचा मोठा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. तेव्हा त्यांना बाळाला बिबट्याने नेल्याचे लक्षात आले.

हे देखील पहा -

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी ऊसाच्या शेतात घेराव घालून मोठा आरडाओरड केला. मोठा आवाज आल्याने बिबट्याने त्या मुलाला शेतात सोडुन त्या ठिकाणाहून पळ काढला.या ठिकाणी स्थानिक नागरिक पोहचल्यानंतर पाहिलं असता बाळ बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे या जखमी बाळाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.सुरुवातीला जखमी बाळाला आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झाल्याने बाळाला तेथून पुण्यात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दरम्यान या परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. असे असले तरी याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. आता  तरी वनविभाग काही उपाययोजना करणार काय पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lizard Facts: पाल सलग पळताना का दिसत नाही? थांबत थांबत का पळते?

Love Rashifal: पाच राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव; बायकोशी वाद की रोमांस, जाणून घ्या विवाहितांसाठी कसा असेल दिवस?

Maharashtra Infrastructure: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

Mumbai Gold मेट्रो लाईन: मुंबईहून ४० मिनिटात गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

SCROLL FOR NEXT