Nashik: बिबट्याचा नागरिकांवर हल्ला; वनविभागाची शोध मोहीम सुरु...(पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: बिबट्याचा नागरिकांवर हल्ला; वनविभागाची शोध मोहीम सुरु...(पहा व्हिडिओ)

अलिकडच्या काळात जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव वाढतच आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: अलिकडच्या काळात जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव वाढतच आहे. प्राण्यांचा जंगलातील (forest) अधिवास कमी होत असल्यामुळे ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकताना दिसून येत आहेत. नुकतेच नाशिक (Nashik) जिल्ह्यात शिकरोड (Shikrod) परिसरातील जय भवानी रोडवर बिबट्याचे (leopard) दर्शन झाले आहे. सदगुरु नगर परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Leopard attack on civilians in Nashik)

पहा व्हिडिओ-

या बिबट्याने नागरिकांवर हल्ला (Attack) केल्याचे देखील माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये सुधीर क्षत्रिय हे नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रूग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या दर्शनानंतर स्थानिकांनी याविषयी लगेचच वनविभागाला (forest department) माहिती दिली आहे. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ जय भवानी रोडवर बिबट्या असलेल्या ठिकाणी पोहोचले असून सध्या बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहेत.

एकीकडे नाशिकमध्ये मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्याकरिता वनविभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे चंद्रपूरमधील (Chandrapur) थर्मल पॉवर स्टेशन परिसरात स्थानिकांकडून वाघाचे (Tiger) फोटो काढण्याकरिता केलेली उठाठेव कॅमेऱ्यात (camera) कैद झालेली आहे. चंद्रपूरमधील थर्मल पॉवर स्टेशन परिसरात स्थानिकांना वाघाचे दर्शन झाले आहे.

वाघ पाहिल्यानंतर काही हुल्लडबाजांनी वाघाच्या अगदी जवळ १५ फुट अंतरावर त्याचे फोटो (Photo) काढण्याचे धाडस करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT