बिबट्याची ही दहशत आता जुन्नर वनपरिक्षेत्रापूरती मर्यादीत राहिली नाहीय... आता हेच नरभक्षक बिबटे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात लहानग्यांपासून मोठ्यांचे बळी घेतायत....हा आक्रोश पहा... अहिल्यानगरच्या खारे कर्जुने गावात रात्री घराच्या अंगणात खेळणाऱ्या 5 वर्षीय़ चिमुकलीवर बिबट्यानं झडपं घातली आणि मुलीला थेट जबड्यातून शेतात ओढत नेलं.... तब्बल 16 तासाच्या तपासानंतर अखेर कुटुंबियांना मुलीचा मृतदेह सापडला. आणि कुटुंबियांच्या पाया खालची जमीनच सरकरली....ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घातला... आणि पुन्हा एकदा बिबट-मानव संघर्षाची धग राज्यभर पसरली...
राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात बिबट्यानं दहशत माजवलीय?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात 2 हजारांहून अधिक बिबट्यांची दहशत
अहिल्यानगरमध्ये दोन मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू
कोल्हापुरात बिबट्याच्या हल्ल्यात वनाधिकारी जखमी
सिंधुदुर्गमध्ये बिबट्याचा मुक्त संचार
नांदेडमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकामे खोळंबली
दरम्यान जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाल्यामुळे राज्यानं केंद्र सरकारकडे बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव पाठवला होता..मात्र वन्यजीव संरक्षण काय़द्यात बदल होत नाही, तोपर्यंत बिबट्यांची नसबंदीचा निर्णय होणार नाही... त्यामुळे बिबटे नेमकं आक्रमक का झालेत? बिबट्यांची नसबंदी करून नेमकं काय साध्य होणार? तज्ज्ञाचं बिबट्यांचा या आक्रमकेवर नेमकं काय म्हणणं ऐका...
महिन्याभरापूर्वी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती... मात्र तरीही प्रशासनाला राज्यातील बिबट्यांवर नियंत्रण मिळवता आलेले नाहीय...बिबट-मानव संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं वारंवार सांगितलं जातयं... मात्र बिबट्यांचा आक्रमकपणा नसबंदीनं रोखता येईल का? एखाद्या मृत्यूनंतर जागी होणारी प्रशासकीय यंत्रणा बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी का ठरतेय...अजून किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार? आणि राज्यातली बिबट्यांची दहशत संपणार हा खरा प्रश्न आहे,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.